टोमॅटो पिकावर येणाऱ्या नागअळीचे एकात्मिक व्यवस्थापन:-
*सामान्य नाव:-* टोमॅटोवरील नागअळी
*शास्त्रीय नाव:-* Tuta abusoluta
*इंग्रजी नाव:-* Toamto Leaf Miner
● *प्रादुर्भावीत पिके:-* टोमॅटो,बटाटा
● *महत्वाचे:-* टोमॅटोवरील नागअळी(Tuta abusoluta)ही टोमॅटो व बटाटा या पिकां व्यतिरिक्त इतर कोणत्याही पिकावर हल्ला करत नाहीत. वेलवर्गीय फळभाज्या व चवळीवर्गीय पिकामध्ये येणारी नागअळी(लीप मायनर) Liriomyza या प्रवर्गातील असते.काही वेळेला वांगी व तंबाखू या पिकावर सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसून येतो.
*●एकात्मिक कीड व्यवस्थापन:-*
•शेतामध्ये नागअळीचा प्रवेश नैसर्गिकरित्या किंवा नर्सरीतून येणाऱ्या रोपांमधून होत असतो.त्यामुळेच प्रतिबंध उपाय करणे खूप महत्वाचे असते.
•सुरवातीस प्रादुर्भाव कमी असताना पांढऱ्या सर्पाकृती रेषा दिसणारी पाने काढून शेताबाहेर नष्ट करावीत.
•तसेच शेत व बांध नेहमी तणमुक्त ठेवावे.कारण यजमान पीक नसताना काही तणांवर उपजीविका करून आपलं अस्तित्व टिकवून ठेवत असतो.
•एकरी 10 ते 12 कामगंध सापळे लावून पिकातील किडीचे प्रमाण व किडीचे नियंत्रण ही करू शकतो.नर पतंग सापळ्यात पकडल्यामुळे जीवनसाखळी तुटून प्रभावी नियंत्रण होते.
•तसेच बॅसीलस थुरेंजेनेसिस युक्त कीटकनाशके,निम तेल, निंबोळी अर्क यांची फवारणी करून लहान अवस्थेत असणाऱ्या अळ्या,अंडीपुंज नष्ट होतील व कीड नुकसान पातळीच्या खाली राहील.
•वरील पद्धतींचा अवलंब करून कीड उत्पादन खर्चात कपात करावी व पर्यावरण पूरक किट व्यवस्थापन करावे.
•जेव्हा वरील पद्धती वापरून सुद्धा कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जातेय असं जाणवल्यास रासायनिक कीटक नाशकांचा वापर करावा. जसे स्पिनोसीन, इन्डोक्सिकार्ब, इमामेक्टीन बेंझोएट.
•रासायनिक कीटकनाशके वापरताना लेबलक्लेम नक्की तपासा.*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱सयाजीराव गोपाळराव पोखरकर, अकोले
🌱कपिल सावळे गडहिंग्लज
🌱अवदुंबर जाधव माळशिरस सोलापूर
🌱सचिन तुकाराम सावंत, सांगली,
🌱दीपक भगत, रमेती
🌱अविनाश गुणे पुणे
🌱दत्तात्रय सूर्यवंशी, सांगली
🌱अमोल पाटील, हेब्बाळ, कोल्हापूर
🌱संतोष जाधव कोल्हापूर
🌱सुदर्शन जमादार शहादा, नंदुरबार
🌱प्रशांत बागल सोलापूर
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा