विद्राव्य खतांची नावे | Names of soluble fertilizers



आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आज आपण अनेक प्रकारच्या रासायनिक खतांचा, संप्रेरकांचा पिकवाढीसाठी उपयोग करत आहोत. वाढत्या वापरासोबत या सर्व घटकाची ओळख व वापरण्याची योग्य पद्धत हे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे,त्या अनुसार आपण रासायनिक खतांचा योग्य व प्रभावी वापर करू शकतो. रासायनिक खतांमध्ये विद्राव्य खतांचा वापर व महत्व खूप वाढलेले आहे. म्हणूनच विद्राव्य खते कोणकोणती आहेत कोणत्या वेळी कोणते वापरावे याचा आढावा घेऊयात. विद्राव्य खते मुख्यतः फवारणीसाठी वापरली जातात त्यासोबत आपण पाण्याद्वारे व जमिनीतून सुद्धा पिकांना अन्नद्रव्ये पुरवू शकतो. आजघडीस खालील प्रकारची विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहेत. 19:19:19, 20: 20: 20, 12:61:00, 18:46:00, 12:32:16, 13:00:45, 00:52:34, 00:00:50, 13: 40:13 हि नत्र:स्फुरद:पालाश(N:P:K) गुणोत्तरामध्ये पाहायला मिळतात. *सर्वसाधारण उपयोग:-* 19:19:19/20: 20: 20:- पिकाच्या जोमदार वाढीसाठी 12:61:00:- फुटवा जास्त येण्यासाठी 00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी 13:00:45:- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी 00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढीसाठी 18:46:00:- पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी *विद्राव्य खतांचे कार्य व महत्व:-* *19:19:19/20: 20: 20:-* या खतांना पिकांचा सुरवातीच्या प्राथमिक अवस्थेत वापरले म्हणतात. या प्रकारात .या प्रकारात नत्र:स्फुरद:पालाश(N:P:K) गुणोत्तर सम प्रमाणात असते. पिकास नत्र:स्फुरद:पालाश एकसारखे उपलब्ध करून दिले जाते. खताचा उपयोग प्रामुख्याने पीकाच्या शाकीय तसेच मूळवाढीसाठी होतो. *12:61:00:-* या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो. तसेच ऊसासारख्या पिकात फुटवे वाढवण्यासाठी वापर होऊ शकतो. या खत प्रकारात पोटॅशियम मूलद्रव्याचे प्रमाण शून्य असते. *00:52:34:-* या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते. *13:00:45:-* या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असते व विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात. ताण सहन करण्याची क्षमता वाढते. *00:00:50:-* या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये गंधक(सल्फेट) उपलब्ध असते, उपलब्ध गंधकामुळे भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले शकते.या खतामुळे पीकअवर्षण स्थितीत तग धरू शकते. *13:40:13:-* पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते. *18:46:00:-* या खतास सामान्यतः DAP या नावाने सुद्धा ओळखतो. भर खत व विद्राव्य खत म्हणून सुद्धा हे काम करते. पीक वाढीसोबत पिकाची रोग प्रतिकारक क्षमता राखून ठेवते व वाढवते. स्रोत:- इंटरनेट व शेतकरी अनुभवारून संकलन:- IPM SCHOOL

 *उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*

🌱 सयाजीराव गोपाळराव पोखरकर,अहमदनगर

🌱सचिन तुकाराम सावंत, सांगली

🌱भागीनाथ शहर, अहमदनगर

🌱बाळकृष्ण अंबिलढोके, कोल्हापूर.

🌱सुदर्शन जमादार शहादा, नंदुरबार

🌱वैभव मारुती जाधव कोल्हापूर

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy