टोमॅटो मधील फळकूज समस्या | Fruiting problem in tomato




 *टोमॅटो मधील फळकूज समस्या* 

टोमॅटो पिक घेताना शेतकऱ्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वांत महत्वाचे म्हणजे पिकावर येणारे कीड आणि रोगाचे व्यवस्थापन वेळीच करणे गरजेचे आहे. त्यामुळे नुकसान कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल. शिवाय उत्पन्न खर्चही कमी येईल. 

  टोमॅटो पिकामध्ये फळे लागायला सुरुवात झाल्यानंतर उद्भवणारी समस्या म्हणजे फळकूज. पिकामध्ये या रोगामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. आज आपण टोमॅटो पिकामध्ये फळकूज होण्याची कारणे आणि त्यावर काय उपाय करता येतील हे पाहूया.

*रोगाचा प्रादुर्भाव:-*

टोमॅटो पिकामध्ये फळकूज समस्या प्रामुख्याने पावसाळ्यात दिसून येते. 

हवामानामध्ये तसेच जमिनीमध्ये जास्त आर्दता रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत असते. 

या रोगाला बक आय रॉट म्हंटले जाते. 

रोगाचा फळावर प्रादुर्भाव झाल्यावर फळावर तपकिरी रंगाचे, पाण्याने भिजल्यासारखे गुळगुळीत डाग दिसून येतात आणि फळ सडायला सुरुवात होते. 

फळ साधारणपणे अर्ध्यापर्यंत सडताना दिसून येते. 

नियंत्रण:-

  • रोगाचे नियंत्रण हे करण्यासाठी सुरुवातीपासून काळजी घेणे गरजेचे आहे. 
  • टोमॅटोची रोपांना दोरीच्या साहाय्याने आधार देणे गरजेचे आहे ज्यामुळे फांद्या तसेच फळे जमिनीला टेकणार नाहीत. 
  • टोमॅटोचे पीक घेताना मल्चिंग पेपरचा वापर करावा. 
  • पिकामध्ये पाण्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करावे. म्हणजेच चांगला वाफसा आल्यानंतरच पाणी देणे गरजेचे आहे. 
  • रोगाचा पिकामध्ये प्रादुर्भाव दिसू लागताच प्रोपीनेब ७०% wp रोगाच्या नियंत्रणासाठी वापरू शकता. 
  • तसेच ब्लॉसम एन्ड रॉट या रोगाविषयी जाणून घेऊया 
  • सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे हा रोग नाही. 
  • फळाच्या वाढ अवस्थेत calcium आणि पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी विकृती आहे. 
  • फळे शेंड्याच्या बाजूने खराब होतात. 
  • फळे सुरुवातीला तपकिरी होतात आणि नंतर काळपट चट्टे पडतात आणि टोकाकडून चपाती होतात. 
  • याच्या नियंत्रणासाठी चिलेटेड स्वरूपातील कॅल्शिअम किंवा कॅल्शिअम नायट्रेट हे पीक वाढीच्या अवस्थेत, फुलोरा अवस्थेत, फळधारणा होत असताना तसेच फळ परिपक्वतेच्या अवस्थेत फवारणी द्वारे किंवा ठिबकद्वारे देणे गरजेचे आहे. 
  • तसेच पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. 
  •  अश्या पद्धतीने पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून काळजी घ्यावी म्हणजेच रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही किंवा झालाच तर वेळीच नियंत्रण करता येईल. 

संदर्भ-ऍग्रोस्टार


*एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇*

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean