सुरवातीच्या काळात सोयाबीनमध्ये किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो | In the initial period, the infestation of insects is seen

 


सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरिपामध्ये घेतले जाणारे प्रमुख पीक आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात याची पेरणी केली जाते. यावर्षी पावसाचे आगमन वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळेस झाल्यामुळे काही ठिकाणी पेरणी लवकर झाली तर काही ठिकाणी उशिरा झाली. 

   सोयाबीन पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळापासून दिसून येतो त्यामुळे आपल्याला एकात्मिक पद्धतींचा अवलंब करणे महत्वाचे आहे तरच आपण किडींचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने करून चांगले उत्पादन घेऊ शकतो. पण राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात दिसू शकतो. सोयाबीन मध्ये सुरुवातीच्या काळात या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 


पाने खाणारी अळी:- 

 सोयाबीन मध्ये सुरुवातीपासून पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पीक दोन पानांवर आल्यापासूनच या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. लहान अळ्या पाने खरवडतात आणि अळी मोठी झाल्यानंतर पानाचा मधला भाग खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवते. 


पाने गुंडाळणारी अळी:-

  सोयाबीनमध्ये दुय्यम असणारी हि कीड सध्या प्रमुख कीड म्हणून दिसून येत आहे.खरिपापाठोपाठ उन्हाळ्यामध्येही घेतले जाणारे सोयाबीन पीक यामुळे या किडीचाही प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. या किडीची अळी पानांच्या मध्ये राहून आजूबाजूची पाने गुंडाळून आतमध्ये राहून पाने खाते. 


उंट अळी:- 

 सोयाबीनमध्ये या किडींचा प्रादुर्भाव देखील पेरणीनंतर १५-२० दिवसानंतर दिसून येतो. अळी उंटाप्रमाणे कुबड काढून चालते. हि अळी सोयाबीनमध्ये पाने खाताना दिसून येते. 

 

खोडमाशी:-

खोडमाशीचा देखील प्रादुर्भाव सोयाबीनमध्ये सुरुवातीच्या काळात कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. प्रौढ माशी खोडावर, फांदीवर अंडी घालते, अंड्यातून बाहेर पडलेली अळी खोड पोखरते. 


चक्रीभुंगा:-

सोयाबीन मध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव देखील सुरुवातीला पाहायला मिळतो. मादी भुंगा खोडाला गोलाकार खाच करून त्यामध्ये अंडी देतो. अंड्यामधून बाहेर पडलेली अळी खोड पोखरते. 


  या किडींचा प्रादुर्भाव बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्याचबरोबर पांढरी माशी, मावा यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे. या किडीच्या मुळे पाने पिवळसर होतात आणि विषाणूजनित रोगांचे वहनाचे काम हे रसशोषक किडींच्या माध्यमातून होते. 

  एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा वापर करून या किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. नियंत्रण उपाययोजनांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करून पिकाचे नुकसान होण्याच्या अगोदर कीड रोखणे गरजेचे आहे,त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा. 


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

 https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean