भात पिकामध्ये नुकसान करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो | Infestation of damaging insects in rice crop

 


भात हे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात तसेच कोकणात प्रामुख्याने घेतले जाणारे पिक आहे. खरिपामध्ये भात पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसून येते.काही भागात पेरणी केली जाते, तर काही भागामध्ये रोप लावणी द्वारे भात पिक लावले जाते.

 भाताचे कमी उत्पादन मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे किडीचा प्रादुर्भाव आहे. रोपांच्या अवस्थेपासून ते पिक काढणीपर्यंत वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला भात पिकामध्ये दिसून येतो. कीड नियंत्रणासाठी पिकामध्ये कोणकोणत्या किडी येतात हे माहिती असल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी मदत होईल आणि आपला उत्पादन खर्चही कमी होईल. 

 

भात पिकामध्ये येणाऱ्या किडी:-

लष्करी अळी (Spodoptera mauritia):-

 अळया लष्कीराप्रमाणे हल्ला करतात. रोपांना मोठया प्रमानात कुरतडतात.

अळया पाने कुरतडतात त्यामुळे धानाचे पिक निष्पर्ण होते. तसेच पीक लोंबी अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला आढळतो.अळया रात्री कार्यक्षम असून दिवसा धानावर, बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात.


गादमाशी (Gall midge, Orseolia oryzae):-

या किडीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेपासूनच दिसून येतो. या किडीची प्रौढ माशी डासासारखी दिसत असून रंग तांबडा आणि पाय लांब असतात. अंडयातून बाहेर पडलेली लहान अळी धानाच्या मुख्य खोडात शिरुन बुध्याजवळ स्थिरावते व त्यावर उपजिविका करीत असते. त्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता नळी अथवा ‘’चंदेरह पोगा’’ तयार होतो अशा पोग्या ला लोंबी धारीत नाही.

तसेच बुध्याच्या बाजूला अनेक फुटवे फुटलेले दिसतात.


खोड किडा (Yellow Stem borer, Scripophaga incertulas):-

या किडीचा प्रादुर्भाव पीक फुलोरा अवस्थेत किंवा लोम्बी अवस्थेत प्रादुर्भाव दिसून येतो. अडी खोड पोखरते त्यामुळे रोपाचा गाभा मरतो व फुटवा सुकतो यालाच किडग्रस्त फुटवा / गाभामर / डेडहार्ट म्हणतात. हा फुटवा ओढल्यास सहज निघून येतो. अशा फुटव्यास दाणे न भरलेभल्या पांढऱ्या ओंब्या असतात. 


पाने गुंडाळणारी अळी:-

 या किडीचे पतंग गडद रंगाचे असून त्यांच्या पंखावर काळपट रंगाच्या नागमोडी रेषा असतात. अळी पानांची गुंडाळी करून आतमध्ये राहून पाने खाते. अळी हिरवट आणि पारदर्शक असते.  


तपकिरी तुडतुडे (Brown plant hopper):-

भाताच्या पिकामध्ये हिरवा तुडतुडे, तपकिरी तुडतुडे आणि पांढऱ्या पाठीचे तुडतुडे अश्या वेगवेगळ्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तपकिरी तुडतुडे यांच्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रौढ व पिल्ले धानाच्या बुंध्यातुन व खोडातून सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन, सुकून वाळते. प्रादुर्भाव शेतात मध्य भागातून गोलाकार खळ्याप्रमाणे सुरु होऊन शेत जळाल्यासारखे दिसते, यालाच ''हॉपर बर्न'' असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि समजा आले तर दाणे न भरताच पोचट राहतात. प्रादुर्भावग्रस्त पेंढा जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही.


 काटेरी भुंगा(हिस्पा):-

सुरुवातीला भरपूर पाऊस आणि त्यानंतर लगेच रिमझिम पाऊस, कमी तापमान, अधिक आर्द्रता हे वातावरण किडीच्या वाढीसाठी पोषक आहे. भुंगे लहान, निळसर काळया रंगाचे चकाकणारे असून पंखावर असंख्य लहान काटे असतात. भुंगे पानाच्या वरच्या बाजुस हरीतद्रव्याचा पापुद्रा खरडतात व खालच्या बाजुस पांढ-या रंगाचा पापुद्रा शिल्लक राहतो. त्यामुळे पानाला मध्यशिरेला समांतर पांढ-या रेषा / पटटया पडतात. तर अळया पाने पोखरतात यामुळे पानाला मध्यशिरेला समांतर पांढरे चटटे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास प्रादुर्भावग्रस्त भाग जळाल्यासारखा दिसतो.

  साधारणपणे या किडींचा प्रादुर्भाव भात पिकामध्ये दिसून येतो. कीड नियंत्रणासाठी किडींची माहिती असणे गरजेचे आहे. कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून सुरुवातीपासून टप्प्या टप्प्याने कीड नियंत्रणाच्या पद्धती वापरल्यास किडींचे चांगल्या पद्धतीने नियंत्रण होईल आणि पिकाचे नुकसान कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल. 

संदर्भ-कृषी जागरण


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

 https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean