कापुस पिकामध्ये या सापळा पिकांचा वापर करू शकतो. | One can use these trap crops in cotton crop.




 शेतातील मुख्य पिकापासून नुकसानकारक किडींना परावर्तित करून मुख्य पिकाचे संरक्षण करण्यासाठी सापळा पीक लावले जाते.नुकसानकारक किडींना आकर्षित करणारे दुसरे पीक मुख्य पिकाच्या भोवती लावल्यामुळे कीड त्या सापळा पिकाकडे आकर्षित होते. त्यामुळे मुख्य पिकाचे किडींपासून संरक्षण करता येते. 

  वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यानुसार त्या किडीला आकर्षित करणारे पीक लावणे गरजेचे आहे. तरच आपल्याला सापळा पिकाचा फायदा झालेला दिसून येईल. 

यासोबतच फायदेशीर मित्रकीटकांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पिकांचा वापर केला जातो. त्यामुळे पिकामध्ये मित्रकिडींची संख्या वाढते आणि शत्रुकिडीचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालेले दिसून येते. 


कापुस पिकामध्ये या सापळा पिकांचा वापर करू शकतो:-


* कपाशीच्या प्रत्येक 10 ओळीनंतर दोन ओळी मका किंवा चवळीची पेरणी करावी. त्यावर नैसर्गिक मित्र कीटकांचे संवर्धन व वाढ होते. चवळीवर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यावर क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल, सिरफिड माशी अशा मित्र कीटकांचीही वाढ होते. ते मावा किडींची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत करतात.

* कपाशीमध्ये उडीद, मुग, यांसारखी आंतरपिके घेतल्यास मित्र कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होते.

* कपाशीमध्ये 10 व्या ओळीत भगर पिकाची एक ओळ टाकावी. भगरीच्या कणसातील दाणे वेचून खाण्यासाठी चिमणी सारखे पक्षी आकर्षित होतात. आकर्षित झालेले पक्षी पिकावरील उंटअळ्या, हेलीकोवर्पा, स्पोडोप्टेरा अशा किडींच्या अळ्या वेचून खातात. परिणामी किडींचे नियंत्रण होण्यास मदत होते.

* कपाशी भोवती झेंडू या सापळा पिकाची एक सीमा ओळ लावावी. झेंडूच्या पिवळ्या फुलांकडे हिरव्या बोंडअळीची मादी पतंग आकर्षित होऊन त्यावर अंडी घालते. 

* झेंडूच्या मुळांमध्ये ‘अल्फा टर्निथल’ हे रसायन स्रवते, त्यामुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होण्यास मदत होते.

* कपाशीभोवती एक ओळ एरंडी या सापळा पिकाची सीमा ओळ घ्यावी. उंटअळ्या व स्पोडोप्टेराचा पतंग एरंडीच्या पानांवर अंडी घालतो. सापळा पिकावर अंडीपुंज व अळ्या वेचून नष्ट कराव्यात.त्यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते.
       
कापूस पिकासाठी या सापळा पिकांचा वापर आपण करू शकतो. पण सापळा पिके लावताना खालील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे
* सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे. तसेच ते उपयोगी असल्यास त्यापासून शेतकऱ्यास अधिक उत्पन्न मिळेल.
* मुख्य पिकाच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे.
* सापळा पिकावरील किडींची अंडीपुंज व किडी वेळोवेळी गोळा करून नष्ट करावीत. 
अन्यथा सापळा पिकातील किडी मुख्य पिकामध्ये येऊन मुख्य पिकाचे नुकसान होऊ शकते.
* सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा केवळ तेवढ्या भागावर कीटकनाशकाची फवारणी करावी.

स्रोत-अग्रोवोन


एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

 https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean