सोयाबीन पिकांमधील येणाऱ्या किडीचे प्रतिबंधक उपाय | Preventive Measures of Pests in Soybean Crops



महाराष्ट्रात सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.  सोयाबीन पिकांवर हवामानातील  प्रतिकूल बदलामुळे विविध किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे पिकाचे नुकसान होते. यामुळे अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावरील किडीना  प्रतिबंध केल्यास ते नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकावरील किडीची माहिती व प्रतिबंधक-नियंत्रण उपाय माहिती असणे. अत्यंत आवश्यक आहे.


एकात्मिक कीड व्यवस्थापन:-

  • * कोणत्याही किडीचे नियंत्रण करताना एकात्मिक दृष्टिकोन ठेवणे महत्वाचे आहे. 
  • * किडीचे नियंत्रण करताना किडीची ओळख आणि त्याप्रमाणेच पिकांमधील प्रादुर्भाव लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे. 
  • * पिकांमध्ये अंडी पुंज दिसल्यास ते गोळा करून नष्ट करावेत.
  • * शेतामध्ये एकरी १० - १२ पक्षीथांबे उभे करा.  
  • * सोयाबीन पिकावर या किडीचा प्रभाव असल्यास शेताभोवती सूर्यफूल आणि एरंडीची रोपे लावूनही ही किड कमी करता येते.
  • * जास्त प्रादुर्भाव असलेल्या पिकाला/रोपांना उपटून ते नष्ट करा. अन्यथा त्याचा प्रादुर्भाव अजूनच वाढत जातो. 
  • * नायट्रोजन युक्त खतांचा वापर शक्यतो कमी करावा. 
  • * पिवळा मोझ्याक व्हायरस रोखण्यासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी ३० - ४० या प्रमाणात लावून घ्यावेत. 
  • * पाने खाणाऱ्या अळीची,पतंग अवस्था नियंत्रित करण्यासाठी स्पोडो लूर आणि फनेल ट्रॅप एकरी १०-१२ वापर करा.  
  • * किडींचा प्रादुर्भाव जाणवत असल्यास सुरुवातीला निम ऑईल २ मिली प्रतिलिटर फवारणी करू शकता. 
  •  * किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यासच  रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेऊ शकता जसे. Chlorpyriphos 25 EC 20मिली प्रति पंप वापरू शकता.

स्रोत-इंटरनेट. 

एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://ipmschoolfarmerseducationplatform.blogspot.com/2023/06/major-pests-of-rice.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing