सापळा पीक म्हणून चवळीचा उपयोग । Use of cowpea as Trap crop | Pest Management |

  *🏫IPM SCHOOL🌱*



*चवळी सापळा पीक म्हणून वापर:-*


शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पन्न मिळण्यासाठी नैसर्गिक वातावरणाबरोबर पिकामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे पिकामध्ये येणारे किडीचे चांगल्या पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे. 

 एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने किडीचे नियंत्रण केल्यास किडीचा पिकामध्ये प्रादुर्भाव कमी प्रमाणात होऊन पिकाचे होणारे नुकसान कमी करून उत्पादन खर्चही कमी होतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये  सापळा पीक महत्वाचे काम करते. सापळा पीक हे मुख्य पिकामध्ये येणाऱ्या किडींना आकर्षित करून मुख्य पिकाचे रक्षण करते. 

 वेगवेगळ्या मुख्य पिकामध्ये येणाऱ्या किडीनुसार पिकाभोवती सापळा पीक लावणे गरजेचे आहे. आज आपण चवळी हे सापळा पीक कोणत्या मुख्य पिकाच्या भोवती लावू शकतो हे जाणून घेऊया. 


*सापळा पीक - चवळी*

* चवळी हे सापळा पीक वेगवेगळ्या मुख्य पिकाच्या भोवती घेऊ शकतो. तसेच चवळी पिकाचा वापर वेगवेगळ्या पिकांमधुन आंतरपीक पद्धतीनेही घेऊ शकतो. त्यामुळे पिकामध्ये येणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने मदत होते. 

* चवळी या पिकाचा वापर भात पिकाच्या सभोवती सापाला पीक म्हणून करू शकतो. * त्यासोबत भुईमूग पिकाच्या भोवती सुद्धा एक किंवा दोन ओळी चवळी लावू शकतो. किंवा आपण भुईमुगाच्या तीन ते चार ओळींनंतर एक ओळ चवळीची लावू शकतो.

* चवळीच्या पिकावर मावा मोठ्या प्रमाणात येतो, त्यामुळे मुख्य पिकाचे मावा किडीपासून रक्षण होते. 

* कापूस पिकाच्या बाजूने सुद्धा चवळीची एक ओळ लावल्याने पिकावर येणारा मावा चवळी पिकावर जाऊन मुख्य पिकाचे रक्षण होते. 

* चवळीची लागवड ऊस पिकाच्या सभोवती सुद्धा करू शकतो. 


चवळीवर मावा हि रसशोषक कीड मोठ्या प्रमाणावर येते आणि मावा खाण्यासाठी लेडी बर्ड बीटल, क्रायसोपा तसेच सिरफीड माशी यांची मोठ्या प्रमाणात होते. 


 चवळी पिकाची लागवड आपण सापळा पीक म्हणून तर करू शकतो तसेच चवळीची लागवड आंतरपीक म्हणून केल्यास त्यापासून अधिकचे उत्पन्न देखील मिळेल.

  त्यामुळे पिकामध्ये येणाऱ्या किडींचे चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहेत. त्यामधीलच उपयुक्त आणि मुख्य पिकाला अनुसरून सापळा पिकाचा वापर करणे गरजेचे आहे. सापळा पीक लावताना मुख्य पिकाला अनुसरून लावावे. सापळा पिकावर येणाऱ्या किडींचा बंदोबस्त करावा. सापळा पिकावर किडींचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास सापळा पीक नष्ट करावे. सापळा पिकावर येणाऱ्या किडींना नष्ट करण्यासाठी जास्त तीव्रतेचे रासायनिक कीटकनाशक फवारणी करू नये. त्यामुळे सापळा पिकावर आलेल्या मित्रकिडी सुद्धा नष्ट होऊन जातील. 



एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean