बीजप्रक्रिया/रोपप्रक्रिया करण्याचे फायदे | Seed/Plant Treatment

 🏫IPM SCHOOL🌱




 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवगळ्या भागामध्ये वर्षभर वेगवेगळी पिके घेतली जातात. जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तर विदर्भ आणि इतर भागात कापूस पीक आणि कोकण भागात भात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. 

 ज्या वेळी बियाण्यांची पेरणी केली जाते त्यावेळी बीजप्रक्रिया आणि ज्यावेळी रोपांची लागण त्यावेळी रोपप्रक्रिया केली जाते.  

   पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य त्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास सुरवातीच्या दिवसामध्ये पिकाचे रोगकिडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. रासायनिक बीजप्रक्रियेनंतर जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. यामुळे अन्नद्रव्यांच्या उपलब्धता वाढून पिकांच्या वाढीला फायदा होतो. पिकांमध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बीजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होते. यामध्ये वेगवेगळे घटक कार्यान्वित असतात. जमीन व बीजांमार्फत होणाऱ्या रोगप्रसार टाळण्यासाठी बीजप्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. 


सर्वसाधारणतः बियाण्याच्या मार्फत पिकांवर ३ प्रकारे रोग येतात. 

१) बियाण्याच्या बाह्य पृष्ठभागावरील रोगकारक सूक्ष्मजीव. 

२) बियाण्यांच्या अंतर्गत भागातील रोगकारक सूक्ष्मजीव. 

३) रोगकारक बिया चांगल्या बियांमध्ये अनवधानाने मिसळणे. 


 बीजप्रक्रिया म्हणजे जमिनीतून किंवा बियाण्यांतून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी बियाण्यांवर जमिनीत पेरणीपूर्वी रासायनिक व जैविक घटकांची प्रक्रिया करणे होय. 

तसेच रोपांची लागण करताना देखील रोपांची मुळे वेगवेगळे घटक एकत्र करून त्या द्रावणामध्ये बुडवून त्यांची रोप लागण केली जाते. 


फायदे:-

१) जमिनीतून व बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. 

२) बियाण्यांची उगवण क्षमता वाढते. 

३) रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. 

४) सुरुवातीपासून पिकांची वाढ एकसारखी होते. 

५) कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय शक्य. 

६) बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे कवच निर्माण होते त्यामुळे सुरुवातीलाच बियाण्याला किंवा रोपांच्या मुळांना बुरशीजनित रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. 

७) रोगाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे उत्पादनात वाढ होते.

८) यामध्ये जैविक बीजप्रक्रिया केल्यास खतांच्या मात्रेत बचत होऊन खर्चामध्येही बचत होते. 

   बिजप्रक्रिया आणि रोप प्रक्रिया हि सुरुवातीच्या काळातील खूप महत्वाची प्रक्रिया आहे. शेतकरी मित्रांनी या गोष्टीची संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी याचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान कमीत कमी होऊन, खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. 

स्रोत-ऍग्रोवन 


एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻

https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean