आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी
🏫IPM SCHOOL🌱
* आंब्याच्या झाडावरील हे नुकसान आंब्यावरील पाने गुंडळणारी अळीच्या प्रादुर्भावामुळे झाले आहे.
आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी
शास्त्रीय नाव - Orthaga euadrusalis
नुकसान:-
आंब्याच्या पानांवर लक्षणे लगेच दिसून असतात. अळ्या कोवळी पानांच्या शिरांमधील भाग खातात आणि शिराच शिल्लक ठेवतात.त्यामुळे कोरडे, जाळीदार आणि वाळलेल्या पानांचे पुंजके तयार झालेले दिसतात.प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असेल तर फांद्या वाळतात ज्यामुळे प्रकाशसंश्लेषणात बाधा येते. किडीमुळे नुकसान झालेला भाग तपकिरी, कोरड्या तसेच गुच्छ झालेल्या पानांमुळे सहज ओळखता येतो. किडीचा प्रादुर्भावामुळे फुलांवर आणि फळधारणा प्रक्रियेवरही परिणाम होतो.
जीवनचक्र:-
किडीचे प्रौढ पतंग हे मध्यम आकाराचे, राखाडी रंगाचे पतंग असतात ज्यात गडद तपकिरी खवले आणि निस्तेज, पांढऱ्या रंगाचे मागील पंख असतात. मादी पिवळसर हिरवी निस्तेज रंगाची अंडी आंब्याच्या पानांवर घालतात जी बहुधा एका आठवड्यात ऊबवतात. हवामान परिस्थितीप्रमाणे अळी अवस्था 15 ते 33 दिवसांची असू शकते. शेवटच्या टप्प्यानंतर अळ्या विणलेल्या जाळ्यातच कोषात जातात. जर झाडाच्या फांदीला धक्का लागल्यास जमिनिवर पडतात आणि तिथेच आपली कोषावस्था पूर्ण होते. कोषावस्था सुमारे 5-15 दिवस असू शकते.
एकात्मिक व्यवस्थापन:-
* आंब्याच्या बागेची/ झाडांची नियमित निरीक्षण करावे.
* झाडावर किडीच्या प्रादुर्भाव झाला असेल तर प्रादुर्भावग्रस्त जाळीदार पाने, फांदीसह तोडून नष्ट करावीत.
* तसेच प्रादुर्भाव झालेल्या झाडाखाली जमिनीवर पडलेली जाळीदार, प्रादुर्भावग्रस्त पाने सुद्धा गोळा करून नष्ट करावीत कारण त्यात परिपक्व अळ्या किंवा कोष असतात.
* मातीमध्ये असलेले कोष नष्ट करण्यासाठी झाडाखालची माती नांगरली जाणे गरजेचे आहे. त्यामुळे मातीमधील कोष/अळ्या बाहेर पासून पक्षी खाऊन टाकतील किंवा उन्हामुळे नष्ट होऊन जातील.
* दाट फळबागेमध्ये फांद्याची छाटणी केली पाहिजे ज्यामुळे बागेमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने पोहोचेल.
* पाने गुंडाळणाऱ्या अळीचे नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण करणारे काही मित्रकीटक निसर्गात उपलब्ध आहेत जसे कि ब्राचिमेरिया लैसस किंवा हॉर्मियस प्रजाती तसेच काराबिड बीटल.
* तसेच हवेमध्ये जास्त आर्दता असताना म्हणजेच जून-जुलै मध्ये ब्युव्हेरिया बॅसियानाची 2 ते 3 वेळा फवारणी केल्यास किडीचे चांगले नियंत्रण होते.
* सुरुवातीपासून एकात्मिक दृष्टिकोन ठेऊन त्यापद्धतीने किडीचे नियंत्रण करायला हवे.
* जर किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असेल तरच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.
* रासायनिक कीटकनाशकांमध्ये लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% EC @ 2.0 ml/लिटर पाणी किंवा क्लोरँट्रीनिलिप्रोल 18.5% SC @ 0.2 ml/लिटर पाण्यामधून फवारणी करावी आणि गरज भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांनी करावी.
स्रोत - इंटरनेट
*उत्तर देणारे शेतकरी मित्र:-*
🌱गजानन विठ्ठलराव माने,दाटेगाव ,हिंगोली
🌱भूषण उत्तम गोविंद, मालेगाव
🌱बाळकृष्ण आंबीलढोके, कागल कोल्हापूर
*🙏उत्तर दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*
एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या नवीनतम अपडेट्ससाठी आमच्याशी नक्की सामील व्हा..👇🏻👇🏻
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा