नारळ शेती |रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन | Integrated management of disease
नारळ शेती करणारे बरेच शेतकरी नारळ झाडावर येणाऱ्या रोगामुळे त्रस्त आहेत. ज्याकारने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. या अगोदर च्या ब्लॉग मध्ये आपण नारळ झाडावर येणाऱ्या रोगांची माहिती घेतली आहे. आज आपण या रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती घेणार आहोत. एकात्मिक रोग व्यवस्थापन:- * नारळाचे नवीन रोप लावताना फक्त नारळच जमिनीत पुरावा. * रोप लावून झाल्यावर रोपाच्या नारळाभोवतीची माती पायाच्या टाचेने घट्ट दाबावी. वा-यामुळे रोप हलू नये, म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या पुराव्यात आणि तिसरी काठी रोपाच्या पूर्वेस दोन्ही काठ्यांवर आडवी बांधावी. या आडव्या काठीला रोप सैलसर बांधावे. असे केल्याने रोपांना काठीचा व्यवस्थित आधार मिळतो. * नवीन लावलेल्या रोपाच्या भोवती जर पावसाचे पाणी साचून राहत असेल तर त्या पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने व्यवस्था करावी. * पाणी साठत असेल तर ते काढण्यासाठी छोटे चर योग्य त्या दिशेने काढावेत. * रोगाची लागण झालेले झाडाचे भाग कापून काढून जाळून टाकावेत किंवा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणातझालेला असल्यास संपूर्ण झाड उ...