नारळ शेती |रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन | Integrated management of disease


 


नारळ शेती करणारे बरेच शेतकरी नारळ झाडावर येणाऱ्या रोगामुळे त्रस्त आहेत. ज्याकारने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. या अगोदर च्या ब्लॉग मध्ये आपण नारळ झाडावर येणाऱ्या रोगांची माहिती घेतली आहे. आज आपण या रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती घेणार आहोत. 

एकात्मिक रोग व्यवस्थापन:-
* नारळाचे नवीन रोप लावताना फक्त नारळच जमिनीत पुरावा. 
* रोप लावून झाल्यावर रोपाच्या नारळाभोवतीची माती पायाच्या टाचेने घट्ट दाबावी. वा-यामुळे रोप हलू नये, म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या पुराव्यात आणि तिसरी काठी रोपाच्या पूर्वेस दोन्ही काठ्यांवर आडवी बांधावी. या आडव्या काठीला रोप सैलसर बांधावे. असे केल्याने रोपांना काठीचा व्यवस्थित आधार मिळतो.
* नवीन लावलेल्या रोपाच्या भोवती जर पावसाचे पाणी साचून राहत असेल तर त्या पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने व्यवस्था करावी. 
* पाणी साठत असेल तर ते काढण्यासाठी छोटे चर योग्य त्या दिशेने काढावेत.
* रोगाची लागण झालेले झाडाचे भाग कापून काढून जाळून टाकावेत किंवा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणातझालेला असल्यास संपूर्ण झाड उपटून नष्ट करावे.
* बागेतील इतर रोपांवर एक टका बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
* आपल्या बागेच्या सभोवती विशेष करून बागेच्या पश्चिमेस सुरुवातीपासूनच सुरूसारखी वारा अडविणारी झाडे लावावीत.

* संततधार पावसाच्या काळात कोंब कूज रोग संभवतो. सुई नरम पडली आहे, असे वाटल्यास उघडीप पडल्यावर शिडीच्या साहाय्याने माडावर चढून तो माड तपासावा. घाणेरडा वासे येत असेल तर कोंब कुजला असे समजावे. 
* कोंबाचा कुजलेला भाग काढून टाकावा. 
* गरज पडल्यास सभोवतीची पाने देठातून कापावीत. 
* कुजलेला संपूर्ण भाग काढून झाल्यावर त्यामध्ये एक टका बोर्डो मिश्रण ओतावे.
* या बरोबरच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक टका बोडॉमिश्रणाची फवारणी कोंबाजवळच्या गाभ्यावर पावसाळ्यापूर्वी करावी.
* उघडीप मिळाल्याबरोबर / रोगट माडांभोवती असलेल्या माडावर बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी, म्हणजे रोगाचा प्रसार होणार नाही.

* करपा रोगाच्या नियंत्रणासाठी बागेस शेणखत, रासायनिक खते व पाणी यांच्या योग्य मात्रा द्याव्यात. 
* पावसाळ्यापूर्वी रोगग्रस्त झाडावरील करपलेल्या झावळ्या काढून नष्ट कराव्यात. * तसेच निरोगी झावळ्यांवर पावसाळ्यापूर्वी एक टक्के तीव्रतेचे बोर्डो मिश्रण अथवा o.३ टक्के मॅन्कोझेब किंवा 0.25 टक्के कॉपर ओक्सयक्लोराइड यांची फवारणी करावी. 
* नियमित सिंचन व अन्नद्रव्यांची शिफारस केलेल्या मात्रा दिल्यास रोगाची तीव्रता कमी होते.

* खोड पाझरणे रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त भाग खरडवून साफ करावा व त्यावर बोडॉपेस्ट लावून डांबराचा लेप किंवा ५ टक्के ट्रायडेमार्फचा लेप द्यावा व त्यावर पातळ डांबर लावावे.
* रोगग्रस्त खरडवून काढलेला भाग जाळून नष्ट करावा. 
* शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खते द्यावीत. पाण्याचे योग्य नियोजन करावे

* फळ गळणे या रोगासाठी 0.3 एलिएट (फॉसिटील एल 80 टक्के) पाण्यात मिसळणारी पावडर 3 ग्रॅम प्रती 1 लीटर पाण्यात) या बुरशीनाशकाचे द्रावण मुळावाटे द्यावे. एक टक्के बोर्डो मिश्रण या बुरशीनाशकांची पहिली फवारणी पावसाच्या सुरवातीस व त्यानंतर ४० दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी. 

* तंजोर विल्ट किंवा बेसल स्टेम आणि रॉट रोगाच्या व्यवस्थापनासाठी
प्रभावित झाडे नष्ट करा.स्यूडोमोनास फ्लूरोसेन्स (PF1) @ 200 g/palm + Trichoderma viride @ 200 g/plant प्रति वर्ष द्या. प्रति झाड 50 किलो शेणखतामध्ये 200 ग्रॅम फॉस्फोबॅक्टर आणि 200 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर मिसळून टाका. 50 किलो शेणखत + कडुनिंबाची पेंड 5 किलो 6 महिन्यांतून एकदा खतांसोबत घाला. प्रभावित छिद्रामध्ये सल्फरची धूळ लावा.
Aureofungin-sol 2 gm + 1 gm कॉपर सल्फेट 100 ml पाण्यात किंवा 2 ml Tridemorph 100 ml पाण्यात शिरेद्वारे दिले जाऊ शकते. (झाडाजवळची थोडी माती काढून सक्रिय मुळांना तिरकस कापून घ्या. हे द्रावण पॉलिथिनच्या पिशवीत किंवा बाटलीत घ्यावे आणि मुळाचा कापलेला भाग द्रावणात बुडवावा). चाळीस लिटर 1% बोर्डो मिश्रण 1.5 मीटर रुंदीप्रमाणे झाडाच्या भोवती माती मध्ये आळवणी करावी.

* लीफ रॉट रोगाच्या नियंत्रणासाठी कुजलेले भाग आणि दोन लगतची पानांमधून काढावेत. हेक्साकोनाझॉल (कॉन्टाफ 5ई) - 2 मिली किंवा मॅन्कोझेब (इंडिफिल एम 45) - 3 ग्रॅम प्रति झाड 300 मिली पाण्यात बुरशीनाशक द्रावण पानाच्या पायथ्याशी म्हणजेच खोडाजवळ ओता. सौम्य संसर्ग झाल्यास दोन ते तीन फवारणीमध्ये नियंत्रण मिळू शकते. जानेवारी, एप्रिल-मे आणि सप्टेंबरमध्ये 1% बोर्डो मिश्रण किंवा 0.5% कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा 0.4% मॅन्कोझेबसह शेंड्यावर आणि पानांची फवारणी करा. 
* ग्रे लीफ स्पॉट रोगाच्या व्यवस्थापनासाठी 0.25% कॉपर ऑक्सिक्लोराईडची पानांवर फवारणी केल्यास रोगाचा प्रसार थांबवला जातो. जास्त प्रादुर्भाव असल्यास 1% बोर्डो मिश्रण किंवा प्रोपिकोनाझोल 0.3% झाडांवर फवारणी करावी.
   नारळामध्ये येणारे महत्वाचे रोग हे आहेत आणि त्यानुसार त्यांचे अगदी सुरुवातीपासून व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. झाडावर सुरुवातीलाच काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणाच्या दृष्टीने पाऊले उचलल्यास नक्कीच कमी नुकसान होऊन चांगले उत्पन्न मिळेल. 
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन(विकासपीड़िया)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean