आच्छादनाचा वापर केल्यामुळे होणारे फायदे | Benefits of using mulch
प्रत्येक वर्षी पावसाची अनियमितता दिसून येत आहे त्यामुळे कधी पाऊस योग्य प्रमाणात पडतो तर कधी जास्त होतो तर कधी खूपच कमी दिसून येतो. त्यामुळे धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या साठ्यावर पाणी शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्याला अपने पीक वाचवायचे असेल तर पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. जमिनीचा प्रकार, पिकाचा प्रकार, पाण्याची गरज या गोष्टी लक्षात घेऊन पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आपली पिके, फळबागा जपण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) तंत्राचा अवलंब अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. हे तंत्र मातीतील ओलावा टिकवून ठेवणे, जमिनीची सुपीकता वाढविणे, तणांचे नियंत्रण आणि जमिनीचे तापमान नियंत्रणात ठेवणे अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकते. जमिनीचा पृष्ठभाग झाकण्यासाठी केलेला विविध सेंद्रिय घटकांचा वापर म्हणजेच आच्छादन होय.
आच्छादनाचा वापर का करावा?
• जमिनीच्या दिवस व रात्र यातील तापमानाची तफावत कमी राहते.
• आच्छादनामुळे जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.
• सक्रिय मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमानाचा समतोल राखला जातो.
• अनावश्यक आणि हानिकारक तणांची वाढ कमी होते.
• जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते.
• बाहेरील तापमान खाली गेले तरी जमिनीचे तापमान गोठण बिंदूखाली जात नाही. परिणामी जमिनीलगत खोडास, कोवळ्या पानांस किंवा नवीन कोंबास इजा होत नाही.
• अतिथंडीच्या किंवा उष्णतेच्या लाटेपासून झाडाचे व त्यांच्या पानांचे तापमान नियंत्रण होण्यास मदत मिळते.
• मजुरीच्या खर्चात बचत होते.
• जमिनीतील अन्नद्रव्यांचे झिरपून (लिचिंग) होणारे नुकसान कमी होते.
आच्छादनासाठी सेंद्रिय घटकांचा विशेषतः पिकांच्या उर्वरित भागांचा, पानांचा वापर केल्यास त्याचे अनेक फायदे दिसून येतात. हंगामामध्ये किंवा हंगाम पूर्ण होत असताना सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया सुरू राहते. कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात उष्णता बाहेर पडते. या उष्णतेमुळे सक्रिय मुळांच्या भागातील तापमान हिवाळ्यात वाढते. तर साधारणपणे उन्हाळ्यापर्यंत कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होत आलेली असते. आच्छादनामुळे सूर्याची किरणे सरळ जमिनीवर पडत नाहीत. एक प्रकारचा थंडावा मुळाच्या भागास आणि खोडास मिळतो त्यामुळे कार्यक्षम मुळाच्या क्षेत्रात उन्हाळात कमी तर हिवाळ्यात जास्त तापमान राहते. वातावरणातील तापमान आणि मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान यात फार फरक राहत नाही. आच्छादनाच्या खाली ओलावा जास्त काळ टिकुन राहतो. सेंद्रिय कर्बामध्ये वाढ झाल्याने जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते तसेच उपलब्ध पाण्याचे प्रमाण वाढते या सर्व कारणांमुळे पिकाच्या मुळांच्या संख्येत वाढ होते. परिणामी पीक चांगल्या राहण्यास, चांगली वाढ होण्यास मदत होते.
यामुळे जमिनीला उन्हाळ्यात पाण्याची कमतरता जाणवत नाही. आच्छादन केल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे तणांचा बंदोबस्त होतो म्हणजे खर्चात बचत होते, जमिनीचे तापमान नियंत्रित राहते त्यामुळे मुळांचा विकास चांगला होतो तसेच बाष्पीभवनाद्वारे जमिनीतील क्षार मातीच्या पृष्ठभागावर येत नाही परिणामी पिक चांगले येते.
अश्या प्रकारे पिकामध्ये आच्छादन केल्यास उन्हाळ्यामध्ये जमिनीचे तापमानात समतोल राखून पिकाची वाढ चांगली होण्यसाठी मदत मिळते. त्यामुळे कमी पाणी असलेल्या ठिकाणी तर पाचट आच्छादनाचा प्रभावी वापर करून पीक चांगले राखून उत्पन्न वाढवण्यास शेतकऱ्याला नक्कीच मदत होते.
स्रोत-ऍग्रोवन
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱सयाजीराव गोपाळराव पोखरकर, अकोले
🌱आदित्य मोरे सोलापूर
🌱प्रेषित चकोले, नागपूर
🌱संतोष जाधव कोल्हापूर
🌱प्रशांत बागल सोलापूर
🌱सागर बाळकृष्ण पुणे
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
.*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा