फळमाशीचा प्रादुर्भाव वांगी पिकात होतो का? वांगी पिकात फळमाशीचा सापळा लावणं गरजेचं आहे का?

 




मित्रहो, 

 IPM  School ब्लॉगस्पॉट मध्ये तुमचं स्वागत. आपण सर्वजण फळमाशी नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर करत असतो. सध्या कलिंगड वेलवर्गीय फळभाज्या जोमाने केल्या जात आहेत. आंब्यासारखी फळपिके मोहराने फुलली आहेत. या दोन्ही प्रकारच्या फळपिकांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामध्ये आपण फळमाशी नियंत्रणासाठी IPM ट्रॅप व मॅक्सप्लस ट्रॅप वापरतो. पिकानुसार जर वेलवर्गीय फळभाज्यामध्ये फळमाशी नियंत्रण करायचे असल्यास मेलन फ्लाय ल्युरचा वापर करावा. आंबा किंवा इतर फळवर्गीय पिकात फळमाशी नियंत्रण करायचे असल्यास फ्रुट फ्लाय ल्युरचा वापर करावा. पण आपण फळमाशीची प्रादुर्भाव लक्षणे व्यवस्थित पाहिल्यास ठराविक पिके सोडून इतर कोणत्याही पिकात हि लक्षणे दिसत नाही म्हणजेच कलिंगड सारख्या वेलवर्गीय फळभाज्या व आंब्यासारखी फळपिके या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाजीपाल्यात फळमाशीचा प्रादुर्भाव होत नाही. तरी सुद्धा बऱ्याच पिकात ज्यामध्ये फळमाशी प्रादुर्भावच करत नाही अश्या पिकात फळमाशीचा सापळा उभा केलेला दिसतो. म्हणूनच कोणत्याही प्रकारचा सापळा पिकात लावताना या सापळ्यांच्या माध्यमातून कोणती कीड नियंत्रित होते,खरंच ती कीड आपल्या तत्सम पिकात प्रादुर्भाव करते का हे आपण तपासून पहिले पाहिजे. 

               उदाहरणासाठी आपण वांगी पिकात लावलेला हा फळमाशीचा सापळा पहा. कोणत्याही प्रजातीच्या फळमाशीचा प्रादुर्भाव वांगी पिकात होत नाही. आपल्याला वांगी पिकात शेंडा व फळ पोखरणाऱ्या किडी व्यतिरिक्त कोणतीही कीड फळे खराब करत नाही. त्यामुळे फळमाशीचे सापळे वांगी पिकात लावण्याची गरजही नसते. असे केल्यास फक्त आपला खर्च वाढतो. वांगी पिकात शेंडा व फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, हडडा बीटल, लाल कोळी या व्यतिरिक्त कोणतीही कीड प्रादुर्भाव करत नाही. शेती करत असताना किंवा एखादे नवीन तंत्रज्ञान हाताळत असताना पूर्ण माहिती घेऊन तसेच मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून अंमलात आणावी. आपला नेहमी कमीत कमी खर्चात चांगले उत्पादन कसे येईल यावर भर असला पाहिजे. तुमच्या कीड व्यवस्थापनाविषयी असलेल्या शंका आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी Green Revolution You tube चॅनल ला भेट द्या व इंस्टाग्रामवर फोल्लो नक्की करा.

.*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#brinjal #brinjalfarming #pestmanagement #farmingtips #agriculture #fruitfly #fruitflytraps #greenrevolutiontraps

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean