कोबी पिकामध्ये कीड | Plutella xylostella
*चौकोनी ठिपक्याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ)* शास्त्रीय. नाव:- *Plutella xylostella* *प्रादुर्भाव लक्षणे:-* मादी पतंग कोबीवर्गीय भाजीच्या पानांवर पिवळसर ५० ते ६० राखी रंगाची अंडी घालतो. त्यातून फिकट हिरव्या किंवा भुरकट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. अळी अवस्था १४ ते १५ दिवसांची असते. भुरकट रंगाच्या पाकोळीच्या पाठीवर चौकटीच्या आकाराचा पांढरा ठिपका असल्याने 'चौकोनी ठिपक्याचा पतंग' हे नाव पडले आहे. अळ्या पानाच्या खालचा पृष्ठभाग खरडून खातात. पानांवर असंख्य छिद्रे पडून पान चाळणीसारखे दिसते. जास्त प्रादुर्भाव असल्यास पानाची चाळणी होऊन पानाच्या शिराच शिल्लक राहतात. *एकात्मिक कीड व्यवस्थापन:-* प्रादुर्भाव ग्रस्त पाने तोडून टाकावीत. एकरी 8 ते 10 कामगंध सापळे (DBM LURE + Delta/Water Trap) चौकोनी ठिपक्याच्या पतंगाच्या नियंत्रणासाठी लावावेत. कोटेशिया प्लुटेला या मित्रकीटकाच्या परजीवी अळीचे संवर्धन करावे. मोहरी या सापळा पिकाच्या २ ओळी कोबीच्या २० ते २२ ओळीनंतर लावाव्यात. मोहरी झाडांकडे ८० ते ९० टक्के चौकोनी ठिपक्याचा पतंग आकर्षित होतात, तर टोमॅटो आंतरपीक घेतल्यास हे पतंग यावर जास्त अंडी घालतात. ...