मातीचे आरोग्य सांभाळण्यासाठी | To maintain soil health

 




 शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन आणि जमिनीची सुपिकता गरजेचे आहे.जमीन हा मर्यादीत स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे त्याची योग्य जोपासना करुन भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक गरजेनुसार योग्य व्यवस्थापन पद्धतीचे अवलंबन करण्याची गरज आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची फेरपालट, सेंद्रिय खतांचा नियमित वापर, इत्यादींचा वापर करुन जमिनीची सुपिकता टिकवुन उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. 

मृदेमध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रिय पदार्थ, २५ टक्के पाणी व २५ टक्के हवा असते. हे घटक संतुलित प्रमाणात असताना कृषी उत्पादनात वाढ व सातत्य मिळते. अलीकडच्या काळामध्ये झालेल्या चुकांमुळे मूलभूत घटकांचे प्रमाण असंतुलीत झाले आहे. त्याला मृदेची धूप आणि सेंद्रिय पदार्थांचे घटते प्रमाण कारणीभूत आहे. सेंद्रिय पदार्थांच्या कमी होणाऱ्या प्रमाणामुळे त्यावर अवलंबून सूक्ष्मजीवांचे (जिवाणू, बुरशी व इतर सूक्ष्म सजीव घटक) व गांडुळासारख्या कृमींचे प्रमाण कमी होते. हे सारे घटक जमिनीला जिवंत करतानाच पिकांच्या वाढीसाठी मदत करत असतात. जमिनीतील खनिज पदार्थांमुळे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. प्रदेशातील हवामान व भौगोलिक घटकांमुळे भौतिक रासायनिक गुणधर्म (उदा. जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब आणि चुनखडीचे प्रमाण) ठरत असतात.


मातीचे आरोग्य सांभाळण्यासाठी उपाय:-


१) पिकांची फेरपालट करणे.

वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घेणे तसेच त्यामध्ये द्विदल पिकांचा समावेश करावा ज्यामुळे मातीचे आरोग्य चांगले राहून त्यामधून अधिक उत्पन्न मिळेल. 

२) पूर्वमशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे करणे.

३) भरखतांचा (शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत, लेंडीखत) वापर हेक्टरी किमान पाच टन करावा.

४) हिरवळीच्या खतांचा वापर करणे.

५) कृषी व्यवसायातील उपपदार्थ (प्रेसमड, कोंबडीखत, पाचटाचे खत) खत म्हणून वापरणे.

६) सेंद्रिय खते : जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब गरजेचे असून, त्यासाठी सेंद्रिय खतांसोबत जिवाणू खतांचा वापर करावा. शेणखत पूर्ण कुजलेले वापरावे, अन्यथा जमिनीची ताकद शेणखत कुजविण्यामध्ये जाते. पिकासाठी त्वरित उपलब्ध होत नाही. 

७) रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर करणे. क्षारवट, चोपण व विम्ल जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारकांचा वापर करणे.

८) शेतात जल व मृदा संधारण करणे.

९) सिंचनाचा कार्यक्षम वापर : अतिरिक्त पाणी देण्यामुळे जमिनीची धूप होणे, जमीन पाणथळ होणे अशा समस्या दिसत आहेत. पाणी हे पिकाच्या गरजेनुसार, जमिनीच्या प्रकारानुसार द्यावे. पाणी क्षारयुक्त असल्यास सेंद्रिय खते व हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर करावा. सोडियम क्षार जास्त असल्यास जिप्समचा वापर करावा. क्षारांना सहनशील पिकांची लागवड करावी. क्षार संवेदनशील पिके टाळावीत.

१०) जमिनीचा सामू हा विविध अभिक्रियांचा निर्देशांक आहे. जमिनीचा सामू सातपेक्षा कमी असल्यास आम्लधर्मी, तर सातपेक्षा जास्त असल्यास विम्लधर्मी  असते. सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5 यादरम्यान सामू असल्यास पिकांसाठी आवश्यक सर्वच अन्नद्रव्ये घेणे शक्य होते.

११) मातीचे संवर्धन : 

आपल्या बागेत आणि मोकळ्या भागात विविध प्रकारची वनस्पती, औषधी वनस्पती, झाडे आणि गवत वाढवा, जे मातीला बांधतात आणि झीज रोखतात.

१२)पिकांचे कुठलेच अवशेष, गवत काडी कचरा न जाळता त्यापासून गांडूळखत, सेंद्रिय खते बनवून शेतीत फेरवापर वाढवावा. त्यामुळे पाणी धारणा क्षमता वाढेल व जीवाणू वाढून घसरलेल्या सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढेल.



*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#integrated #farm #soil #soilpest #pest #pestmanagement #gogreen #greenrevolution87 #nematodecontrol #smartfarmer #smartfarming #farmingtips

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

सोयाबीन काढणी | काढणी नंतर घ्यावयाची काळजी | Precautions of Harvesting soyabean