सोयाबीन मधील पाने गुंडाळणारी अळी | Leaf Folder Caterpillar | Omiodis indicata
सोयाबीन मध्ये हे अश्या प्रकारचे पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावामुळे झाले आहे.
*सोयाबीन मधील पाने गुंडाळणारी अळी*
*शास्त्रीय नाव:* Omiodis indicata
*जीवनचक्र:-*
या किडीचे पतंग फिकट तपकिरी रंगाचे असतात आणि पंखांवर काही गडद रेषा आणि ठिपके असतात. पतंगांच्या मिलनानंतर मादी पतंग 250 ते 300 अंडी पिकामध्ये देते. अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळ्या सुरुवातीला पाने खरवडतात आणि पानाच्या मध्ये राहून आजूबाजूची पाने जोडतात. पानांच्या मध्ये राहून पाने आतून खातात. या किडीची अळी लहान, हिरवट रंगाची असून तिचे डोके काळे असते. पूर्ण वाढ झालेली अळी हिरव्या रंगाची २ ते २.५ सें.मी. लांबीची असते. पिकाचे 15 ते 20 दिवस नुकसान करून अळी कोषावस्थेत जाते. कोषावस्था पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पतंग बाहेर येतो. किडीचे संपूर्ण जीवनचक्र 25 ते 30 दिवसामध्ये पूर्ण होते.
*नुकसान:-*
या किडीच्या अळ्या सुरुवातीस पाने पोखरून त्यावर उपजीविका करतात. ही कीड एक किंवा अधिक पाने एकमेकांस जोडून पानाच्या सुरळीत राहून त्यावर जगते. चिटकलेली पाने उघडून पाहिल्यास किडीची विष्ठा दिसते. परिणामतः प्रादर्भाव झालेली पाने गळून पडतात. सोयाबीन पिकामध्ये गुंडाळलेली पाने दिसल्यास या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजू शकतो.
*व्यवस्थापन:-*
* सोयाबीनची पेरणी वेळेवर करावी.
* नत्रयुक्त खतांचा समतोल प्रमाणात वापर करावा.
* किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकांची फेरपालट करावी.
* पिकांमधील तसेच बांधावरील तण नष्ट करून पीक तणमुक्त ठेवावे.
* पिकात 10 ते 15 प्रति एकर पक्षीथांबे उभा करावेत.
* किडींना प्रतिरोध होण्यासाठी सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी.
* पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भावग्रस्त भाग अळीसहीत नष्ट करावा.
* पिकामध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर करून पाने खाणाऱ्या अळीचे पतंग पकडून किडीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो.
* पिकांची नियमित पाहणी करून किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास नियंत्रणाचे उपाय योजावेत.
* जर किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी घ्यावी.
* रासायनिक कीटकनाशकांमध्ये फेनवलरेट 20 ईसी 17 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 ई.सी.16 मि.लि. किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी. प्रति/10 लिटर पाणी घेऊन फवारणी करू शकता.
स्रोत-इंटरनेट
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*
🌱कैलास ढोणे
🌱भागीनाथ आसने, अहमदनगर
🌱वैभव जाधव, कोल्हापूर
🌱योगेश म्हात्रे
🌱सुनील कुलकर्णी
*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #gogreen #soyabean #soyabeanfarming #pest #soyabeanpest #leaffoldingcaterpillar #management #agriculture
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा