तंबाखू पिकात वापरायचे कामगंध सापळे । Traps used in Tobacco | Integrated Pest Management



तंबाखू पीक हे उत्तर कर्नाटक महाराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जसे कोणत्याही पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे पिकामध्ये येणाऱ्या किडींचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणे आहे. किडींच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी पिकामध्ये कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो याची माहिती असणे आवश्यक आहे. 

 पिकामध्ये येणाऱ्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये प्रमुख गोष्ट आहे ती म्हणजे कामगंध सापळे आणि चिकट सापळे यांचा वापर. तंबाखूवरील पाने खाणारी अळी, शेंडा खाणारी अळी (हेलिकोव्हर्पा आर्मीगेरा), कटवर्म (ऍग्रोटिस यप्सिलॉन) अळी या प्रमुख किडी तसेच पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो.  तर आज आपण जाणून घेऊयात कि तंबाखू पिकामध्ये कोणत्या किडींच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा आणि चिकट सापळ्यांचा वापर करू शकतो. 


*तंबाखूमधील पाने खाणारी अळी:-*

या किडीचे शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा लिट्युरा आहे. या किडीचा प्रादुर्भाव अगदी सुरुवातीपासून दिसून येतो.हि अळी तंबाखूची पाने खाते आणि अशी पाने जाळीदार झालेली दिसतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी स्पोडो ल्युर आणि फनेल ट्रॅप १० प्रति एकरी सुरुवातीला लावावेत. सापळ्यामधील ल्युर दर ४५ दिवसांनी बदलावी लागते. 


*कोवळा शेंडा खाणारी अळी:-*

या किडीचे शास्त्रीय नाव हेलिकोव्हर्पा आर्मीगेरा आहे. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती प्रामुख्याने कोवळे शेंडे खाताना दिसून येते. या किडीच्या व्ययवस्थापनासाठी हेलिको ल्युर आणि फनेल ट्रॅप १० ट्रॅप प्रति एकरी लावावेत. यासुद्धा सापळ्यामधील ल्युर ४५ दिवसांनी बदलावी. 


 तंबाखू पिकामध्ये येणाऱ्या या २ प्रमुख किडींसाठी कामगंध सापळ्यांचा वापर करू शकतो. त्यानंतर पिकामध्ये येणाऱ्या पांढरी माशी, मावा, तुडतुडे या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे ३० ते ४० प्रति एकरी सुरुवातीपासून लावावेत. 


सापळा लावलेल्या तारखेपासून ४५ दिवसांनी ल्युर बदलून घ्याव्या. सापळ्यामध्ये सापडणारे पतंग मोजून प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. प्रादुर्भाव वाढतोय असं जाणवलं तर सापळ्यांची संख्या वाढवावी. एकात्मिक कीड व्यवस्थापनामधील इतर पद्धतींचा वापर चालू ठेवावा. 



*उत्तर उत्पादन शेतकरी मित्र:-*

 🌱पी.एस. बर्डे अकोला

🌱तांडले पुंडलिक कालियास, देवांगर 

*🙏उत्तराबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏*

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipm_school #IPM #gogreen #Tobacco #Tobaccofarming #Tobaccoplants #disease #wilting #management #diseasemanagement #farming

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit

आंब्यावरील पाने गुंडाळणारी अळी | Orthaga euadrusalis | आंब्यावरील किडी

ऊसाचे खोडवा |सुरुवातीच्या काळात | घ्यावयाची काळजी | Sugarcane management