वांगी पिकातील फळ आणि शेंडा पोखरणारी अळी । नुकसान आणि नियंत्रण । Brinjal Pest Management
भाजीपाला पिकवणारे बरेच शेतकरी प्रामुख्याने वांगी पिकाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात करतात. बाजारामध्ये कायस्वरूपी मोठ्या प्रमाणावर मागणी असणारे हे पीक आहे आणि लोकांच्या रोजच्या जेवणात याचा समावेश होत असल्यामुळे याची मागणी बारा महिने पाहायला मिळते.
वांगी पिकवताना शेतकऱ्याला सर्वात मोठी समस्या येते ती म्हणजे पिकामध्ये येणाऱ्या किडीचे नियंत्रण करणे. वांगी पिकामध्ये शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, पाने खाणारे वीवील, लाल कोळी, पांढरी माशी, हड्डा भुंगा या किडींमुळे नुकसान होते. पण सगळ्यात जास्त नुकसान कारक कीड येते ती म्हणजे शेंडा आणि फळ पोखरणारी अळी. तर आज आपण या किडीचे अगदी सुरुवातीपासून कसे नियंत्रण केले पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
शेंडा आणि फळ पोखरणारी अळी:-
या किडीचे शास्त्रीय नाव लुसिनोडेस ऑरबोनालीस असून वांगी पिकामध्ये सर्वांत जास्त नुकसान या किडीमुळे होते.
नुकसान:-
• पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेपासूनच या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीचा मादी पतंग कोवळ्या शेंड्यावर,फळावर अंडी देतो.
• अंड्यांमधून बाहेर पडलेली अळी सुरवातीस शेंड्यामध्ये शिरते, शेंडा आतील बाजूने पोखरते. त्यामुळे शेंडा सुकतो.
• फळे आल्यानंतर अळी फळांचे नुकसान करायला सुरवात करते.
• फळ पोखरून अळी जसे पुढे खात जाते तशी मागे विष्ठा सोडते त्यामुळे फळ बाहेरून डागाळते तसेच कीटकनाशके सुद्धा अळीपर्यंत सहजासहजी पोहोचत नाहीत. • शेतीमालाचा दर्जा खालावतो आणि बाजारामध्ये चांगला दर मिळत नाही.
किडीचे जीवनचक्र:-
किडीचा पतंग मध्यम आकाराचे असून पुढच्या पंखांवर काळे आणि तपकिरी ठिपके पांढऱ्या रंगावर उठून दिसतात. मादी पतंग पिकामध्ये पांढरट रंगाची तांदळासारखी लांबट अंडी देतात. 3-5 दिवसांनी त्यामधून अळी बाहेर पडते. अळीचा रंग गुलाबी असून पिकामध्ये साधारण 15 दिवस नुकसान करून अळी कोषावस्थेत जाते. 8-10 दिवसाची कोष अवस्था पूर्ण करून पुन्हा पतंग बाहेर येतो. किडीचा संपूर्ण जीवनचक्र हवामानानुसार साधारण 35-50 दिवसात पूर्ण होते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन:-
* प्रामुख्याने ही कीड फक्त वांगी पिकामध्ये प्रादुर्भाव करते.
* किडीची जात निवडताना शक्यतो किडीसाठी सहनशील किंवा प्रतिकारक प्रजातींची निवड करा.
* किडीच्या व्यवस्थापनासाठी ब्रिन्जल ल्युर व फनेल ट्रॅप एकरी 10 ते 12 या प्रमाणात लावून घ्यावेत. दर 45 दिवसांनी सापळ्यातील ल्युर बदलावी.
* पिकामध्ये नत्र युक्त खतांचा अतिवापर टाळावा, त्यामुळे किडींचे अंडी देण्याचे प्रमाण वाढते.
* रोप लागणी नंतर २० दिवसांनी किंवा दर आठवड्याला सुकलेले शेंडे व किडलेली फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत. किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावी.
* पिकामध्ये शेंड्यांवर आणि फळांवर किडीचे अंडीपुंज दिसताक्षणी नष्ट करून टाकावेत.
* पिकामध्ये शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या किडीची अंडी अवस्था नष्ट करण्यासाठी ट्रायकोग्रामा मित्रकीटक एकरी 1 ते 1.5 लाख दोन ते तीन वेळेला सोडावीत.
* सुरवातीस फुले येईपर्यंत दर आठवड्यास निम तेल 300 ppm 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.
* एवढे करूनही किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळी ओलांडतेय असं जाणवल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.
* * सायपरमेथ्रिन २५ ई.सी. ५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २०% ई.सी. २० मिली. किंवा डेल्टामेथ्रीन + ट्रायझोफॉस (संयुक्त किटकनाशक) २० मिली.प्रति 10 लिटर याची फवारणी करू शकतो.
* रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्या आधी लेबल क्लेम नक्की वाचा.
* कीड नियंत्रणासाठी फक्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता इतर सर्व उपायांचा एकत्रित उपयोग केल्यास अतिशय प्रभावी कीड नियंत्रण होईल.
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
सुहास पाटील,
अमोल पाटील, हेब्बाळ कोल्हापूर
दिव्याकुमार भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
विशाल कऱ्हाळे, नांदेड
हनुमान चव्हाण,
पुंडलिक कैलास तांदळे, चाकूर लातूर
ओंकार शिवाजीराव जगदंबे, धर्माबाद नांदेड
संकेत लब्दे, देवगड सिंधुदुर्ग
भागीनाथ आसने, अ. नगर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #brinjal #pest #brinjalfruitandshootborer #brinjalfarming #agriculture
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा