उन्हाळ्यात काकडीचे पीक घेताना घ्यावयाची काळजी । Cucumber | Summer Vegetables |

 



काकडी हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाणारे पीक आहे. कमी कालावधी आणि कमी मेहनतीमध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारे हे पीक योग्य जातींची निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड आणि रोग व्यवस्थापन आणि पीक काढणीची योग्य वेळ याचे व्यवस्थित नियोजन केल्यास चांगले उत्पन्न शेतकरी  शकतात.  

  काकडीला विशेषकरून उन्हाळ्यात चांगली मागणी असते. काकडी ही सर्वांची आवडती फळभाजी असून तिचा उपयोग कोशिंबीर किंवा कच्ची खाण्यासाठी करतात. उन्हाळ्यात काकडीचे पीक चांगले येण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. 


उन्हाळ्यात काकडीचे पीक घेताना कोणती काळजी घ्यावी. 

योग्य जातीची निवड:- उन्हाळ्यात जर काकडीचे उत्पन्न चांगले घ्यायचे असेल तर योग्य जातींची निवड खूप महत्वाची आहे. यामध्ये हिमांगी, पुना खिरा, फुले शुभांगी, जिप्सी, सलोनी, मालिनी सारख्या वाणाची निवड करू शकता. 


लागवडीची योग्य वेळ - पिकाची लागवड योग्य वेळीच करणे जरुरीचे आहे कारण योग्य वेळी लागवड केली म्हणजे वेळेत तोडणी चालू होऊन बाजारामध्ये मागणी आहे तोपर्यंत फळे बाजारामध्ये गेल्यास शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल. 

 

खत व्यवस्थापन - पिकाला सुरुवातीपासून अन्नद्रव्य खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. सुरुवातीला जमीन तयार केल्यानंतर भरखताचा डोस तसेच पिकाच्या वाढीनुसार गरजेनुसार आणि प्रमाणात खते देणे गरजेचे आहे.  

 

पाणी व्यवस्थापन - उन्हाळ्यात घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी पाणी नियोजन खूप महत्वाचे आहे. कारण गरजेनुसार पाणी दिले गेले तरच काकडीचे चांगले पीक येऊन चांगले उत्पन्न मिळेल. 


कीड आणि रोग व्यवस्थापन - पिकामध्ये येणारे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच त्याचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. काकडी पिकामध्ये मररोग, भुरी आणि केवडा रोग तसेच पाने खाणारी अळी, फळमाशी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव पिकामध्ये दिसतो त्यामुळे त्यांचे वेळीच नियंत्रण करावे. 


 काकडीचे पिक घेत असताना या महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते. त्यामुळे पिकाचे नुकसान कमी होईल आणि वेळीच सर्व व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पन्न मिळेल. 

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

संकेत लब्दे, देवगड सिंधुदुर्ग 

निखिल तेटू, कुऱ्हा अमरावती 

सचिन भालेराव, अ. नगर 

दिव्याकुमार विद्याधर भोसगे, जयसिंगपूर कोल्हापूर 

ओंकार शिवाजीराव जगदंबे, धर्माबाद नांदेड 

अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती 

   उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipm_school #IPM #cucumber #vegetables #summervegetables #farming #agriculture


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

आंब्यामधील फळमाशी । जीवनचक्र आणि व्यवस्थापन । Fruit Fly Management

मिरची पिकामध्ये थ्रिप्स नियंत्रण । एकात्मिक व्यवस्थापन पद्धती । Thrips Management