आंब्यामधील फळमाशी । जीवनचक्र आणि व्यवस्थापन । Fruit Fly Management


 


सध्या आंब्याचा हंगाम सर्वत्र चालू झालेला आहे. कोकणामध्ये आंबा सर्वात अधिक प्रमाणावर पिकवला जातो. हवामानानुसार वेगवेगळ्या गोष्टींमुळे आंबा पिकाचे अधिक नुकसान होऊ शकते, त्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड आणि रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या सर्व घटकांचे नियोजन व्यवस्थित झाले नाही तर मोठ्या नुकसानाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. 

  आंबा पिकांमधील सर्वात महत्वाची आणि नुकसानकारक कीड म्हणजे फळमाशी. संपूर्ण भारतामध्ये फळमाशीच्या वेगवेगळ्या प्रजाती दिसून येतात. फळमाशी हि संपूर्ण वर्षभर सक्रिय असते पण फळ लागण्याच्या अवस्थेमध्ये अधिक सक्रिय दिसून येते. आपल्याकडे बॅक्ट्रोसेरा डॉर्सेलीस जातीची फळमाशी आंबा पिकावर आढळतात.


*फळमाशीची ओळख*

आंबा पिकातील फळमाशी पिवळसर सोनेरी रंगाची असते. सामान्यतः काढणीस तयार झालेल्या फळांमध्ये मादी फळमाशी अंड नलिकेच्या साह्याने फळाच्या सालीखाली पुंजक्यात अंडी घालते. एक मादी फळमाशी सुमारे १००-३०० अंडी एका पुंजक्यात घालते. अळी फिक्कट पांढऱ्या रंगाची व डोक्याकडे निमुळती असते. अळी गरावर उपजीविका करते, त्यामुळे फळे कुजतात आणि खाली गळून पडतात. परिणामी अशी फळे खाण्यायोग्य राहत नाहीत. अळी अवस्था १० ते १५ दिवसांची असते. पूर्ण वाढलेल्या अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात. कोष अवस्था ८ ते १२ दिवसांची असते. कोषामधून फळमाशीचे प्रौढ किटक बाहेर येऊन पुन्हा अंडी देतात.

अशा प्रकारे एका वर्षात ७ ते ८ पिढ्या पूर्ण होतात.


*नुकसान:-*

फळमाश्यांचा प्रादुर्भाव आंबा पिकामध्ये २५ ते ४० टक्क्यांपर्यंत आढळून येतो.मादी फळमाशी फळाला डंख मारून फळामध्ये अंडी देते. अंड्यामधून बाहेर पडलेल्या अळ्या फळातील गर खातात. त्यामुळे फळे खराब होतात तसेच फळे कुजायलाही सुरुवात होते. फळमाशीचे नुकसान झालेल्या फळांची गुणवत्ता कमी घेऊन ती खाण्यायोग्य राहत नाहीत.


*फळमाशीचे व्यवस्थापन:-*

* फळबागेमध्ये मशागत करावी ज्यामुळे जमिनीमध्ये असणारे फळमाशीचे कोष नष्ट होतील. 

* आंब्याच्या झाडाला मोहर दिसू लागताच ट्राय ट्रॅप आणि फ्रुट फ्लाय ल्युर एकरी १० या प्रमाणात लावावेत. ट्रॅपमधील ल्युर प्रति ६० दिवसांनी बदलावी. 

* फळमाशीचे ट्रॅप लावल्यामुळे नर फळमाशी सापळ्यामध्ये पकडून त्याचा जीवनचक्र तोडले जाते त्यामुळे मादी फळमाशी अंडी देऊ शकत नाही. 

* सुरुवातीपासून सापळे लावल्यामुळे फळमाशींची संख्या नियंत्रणात राहते. 

* शक्य असल्यास फळाला बॅगिंग करू शकता ज्यामुळे फळमाशी फळाला नुकसान पोहचवणार नाही.  

* फळे पूर्ण पक्व होण्याआधी काढावीत. 

* पक्व झालेली फळे गळून बागेत पडतात, त्यामुळे फळमाशीची उत्पत्ती वाढते. ते टाळण्यासाठी खाली पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.

* फळमाशीच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषध प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे वर दिलेल्या गोष्टींचा टप्याटप्याने वापर केल्यास फळमाशीचे चांगले नियंत्रण होऊ शकते. 


उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

अनिल तुकाराम चिमणे, चंदगड कोल्हापूर 

संकेत लब्दे, देवगड सिंधुदुर्ग 

दिव्यकुमार विद्याधर भोसगे, जयसिंगपूर कोल्हापूर 

राधाकिसन गवारे, बीड

धनाजी पाटील, बेळगाव कर्नाटक 

अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती 

ओंकार शिवाजीराव जगदंबे, धर्माबाद, नांदेड

निखिल मधुकर तेटू, कुऱ्हा अमरावती 

भागीनाथ आसने, कोपरगाव अ. नगर 

प्रदीप थोपटे, भोर पुणे 

  उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#Mango #fruitfly #pest #pestmanagement #IPM #ipmschool #mangofarming #smartfarming

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

मिरची पिकामध्ये थ्रिप्स नियंत्रण । एकात्मिक व्यवस्थापन पद्धती । Thrips Management