सुरुवातीच्या काळात पिकासाठी आवश्यक जिवाणू । कार्य आणि फायदे । Use of Bio fertilizer
पिकाच्या वाढीसाठी खरेतर मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते यापैकी नत्र, स्फुरद आणि पालाश हि मुख्य अन्नद्रव्यांची गरज पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत जास्त दिसून येते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात नत्रयुक्त खताचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. ज्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन जास्त चांगले उत्पन्न पिकापासून मिळेल.
सध्या रासायनिक खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे अश्या परिस्थितीत पिकाला देत असलेली भरखते पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध झाली तर खतांवर होणार खर्च कमी होऊन पिकाची वाढ सुद्धा चांगली होईल. आणि यासाठीच जिवाणूंचा वापर केल्यास खूप चांगले परिणाम दिसून येतील. पण पिकाच्या अवस्थेनुसार जिवाणूंचा उपयोग करावा लागतो.
पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये द्यायचे जिवाणू
पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पिकाला जास्त गरज नत्राची असते तरीही स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्येही तितकीच महत्वाची असतात. वेगवेगळ्या पिकानुसार नत्र उपलब्ध करून देणारे जिवाणू वेगळे असतात आणि पिकानुसार त्यांचा वापर करणे गरजेचे असते.
अझाटोबॅक्टर- हे जिवाणू शेंगवर्गीय पिके वगळता इतर एकदल व तृणधान्य पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने नत्र वायूचे अमोनियात रूपांतर करतात. त्यामुळे नत्र पिकांना उपलब्ध होते. उदा. ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कांदा, बटाटा, कापूस, सूर्यफूल, वांगी, मिरची तसेच फुलझाडे व फळझाडांसाठी वापरावे.
अझोस्पिरिलिम - हे जिवाणू तृणधान्यांच्या व भाजीपाला पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहून नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करते. हे अझाटोबॅक्टरपेक्षा अधिक कार्यक्षम असून १.५ ते २ पट अधिक नत्र पिकांना उपलब्ध करून देतात.
रायझोबियम - हे सहजीवी जिवाणू द्विदल (शेंगवर्गीय) वर्गीय वनस्पतीच्या मुळावर गाठी करून राहतात आणि हवेतील मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करून अमोनियाच्या रूपाने पिकास उपलब्ध करतात. हे सोयाबीन, भुईमूग, चवळी, हरभरा यासारख्या पिकामध्ये वापरू शकतो.
अॅसिटोबॅक्टर : शर्करायुक्त पिकांमध्ये (उदा. ऊस, मका, ज्वारी, बीट इ.) सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. हे जिवाणू उसाच्या कांड्या, पाने व मुळांमध्ये वास्तव्य करतात. आंतरप्रवाही असल्यामुळे स्थिर केले नत्राचा पीक वाढीमध्ये अधिक वापर केला जातो.
स्फुरद विरघळविणारे जिवाणू - अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद हे सूक्ष्मजीव विरघळवून २० ते ३० टक्के द्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. पिकांची मुळे ते शोषून घेऊन पिकांची स्फुरदाची गरज भागवली जाते. सर्व पिकांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो.
पालाश विरघळविणारे जिवाणू - अनेक वेळा जमिनीमध्ये पालाश हे अन्नद्रव्य मुबलक, पण स्थिर स्वरूपात असते. फ्राटेरिया ऑरेंशिया हे जिवाणू स्थिर स्वरूपातील पालाश मुक्त करून पिकाला उपलब्ध करून देतात.
या जिवाणूंची गरज एकचवेळी भागवण्यासाठी जिवाणू NPK कंसोर्शिया हे पिकाच्या सुरुवातीच्या काळात पिकाला दिल्यास खूप चांगला फायदा होईल. कोणतेही जिवाणू वापरायच्या वेळी त्याचा CFU काउन्ट म्हणजेच जिवाणूंची संख्या तपासणे गरजेचे असते. जिवाणूंची संख्या जितकी जास्त तितके लवकर result पिकामध्ये दिसून येतात.
जिवाणू वापरण्याचे फायदे-:
* बीजप्रक्रिया केल्यास बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते.
* पिकांची वाढ जोमदार होते.
* पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
* जिवाणू खते वापरल्यास पीक उत्पादनात १५ ते २०% वाढ होते.
* जिवाणू खतांच्या वापराने जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते.
* जिवाणू खतांचा जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
* नत्र प्रमाण योग्य ठेवून पोत सुधारतो व नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो.
* रासायनिक खताची १५ ते २५ बचत होते.
जिवाणू खतांच्या वापरण्यामुळे एवढे फायदे मिळत असतील तर शेतकरी मित्रांनी रासायनिक खताचा उपयोग कमी करून या जिवाणू NPK कंसोर्शियाचा वापर नक्की करून शक्य तितका कारच कमी करून उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
संदर्भ - अग्रोवोन
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
महादेव निगडे, दौड पुणे
ओंकार शिवाजीराव जगदंबे, धर्माबाद नांदेड
ओमकार मासाकल्ले, नाशिक
अमोल पाटील, हेब्बाळ कोल्हापूर
पुंडलिक कैलास तांदळे, चाकूर लातूर
दिनकरराव गवळी
संकेत लब्दे, देवगड सिंधुदुर्ग
दिव्याकुमार भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
वेंकटी चव्हाण
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #jivanu #biofertilizer #benefits #farming #agriculture
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा