टोमॅटोमधील नागअळी । नुकसान आणि नियंत्रण । Management of Tuta Leafminer |
टोमॅटो पिकामध्ये तसे बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो ज्यामुळे पिकाचे अधिक नुकसान होते. त्यामधील सध्या टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या नागअळी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ज्या ठराविक भागात टोमॅटो पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्या क्षेत्रामध्ये तर किडीमुळे खूप नुकसान दिसून येत आहे. वेळेत उपाययोजना न अवलंबल्यास संपूर्ण प्लॉट सुद्धा हातचा जाऊ शकतो. त्यामुळे जे शेतकरी टोमॅटो पिकवतात त्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागण करण्याअगोदर पासून किडीच्या नियंत्रणासाठी महत्वाच्या गोष्टीचा योग्य वेळी वापर करून होणारे नुकसान टाळता येईल. तर आज आपण टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या याच नागअळीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण कसे करता येईल याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. टोमॅटो पिकामध्ये येणारी नागअळी:- या किडीचे शास्त्रीय नाव टूटा अबसोल्यूटा असून हि प्रामुख्याने टोमॅटो पिकामध्ये आणि त्यानंतर बटाटा पिकामध्ये सुद्धा प्रादुर्भाव करू शकते. किडीचे जीवनचक्र:- किडीचे पतंग लहान आकाराचे आणि तपकिरी रंगाचे असून पिकामध्ये पानांच्या मागच्या बाजूला लपून राहतात. मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूला, फांद...