पिकामध्ये येणारे विषाणूजन्य रोग।प्रतिबंधक उपाय।Precautions For Viral Disease।
शेतकरी शेतामध्ये वेगवेगळी पिके घेत असताना पिकामध्ये अनेक प्रकारच्या किडीमुळे आणि रोगांमुळे नुकसान होते. पिकामध्ये या होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकरी अनेक उपायांचा उपयोग करतात ज्यामुळे त्यांचे नियंत्रण होऊन उत्पन्नामध्ये वाढ होते.
पण पिकामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. विषाणूजन्य रोगांमध्ये मिरची पिकामध्ये येणाऱ्या चुरडा मुरडा रोग असेल, सोयाबीन पिकामध्ये येणार येल्लो वेन मोसाइक असेल किंवा वेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये येणार कुकुर्बिट मोसाइक व्हायरस असेल यासारख्या रोगांमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. एकदा रोगाचा प्रादुर्भाव झाला कि नियंत्रण उपाय करणे खूपच अवघड जाते त्यामुळे आज आपण विषाणूजन्य रोग पिकामध्ये येऊ नयेत म्हणुत प्रतिबंधात्मक उपाय काय करता येतील याबद्दल माहिती घेणार आहोत.
कोणताही विषाणू सजीव वस्तू च्या संपर्कात येताच सक्रिय होतो.इतर वेळी ते निर्जीव अवस्थेत किंवा सुप्तावस्थेत असतात. वनस्पतीला शेती अवजारांद्वारे झालेल्या इजामधून किंवा रसशोषक किडीच्याद्वारे केल्या गेलेल्या पंक्चर मधून, इतर कोणत्याही कारणामुळे वनस्पतीवरील आघातामुळे विषाणूंचा वनस्पतीच्या शरीरात शिरकाव होतो. व ते सक्रिय होऊन वनस्पतींमधील अन्न घेऊन त्यांची संख्या स्वतःहून वाढवण्यास सुरु करतात.
प्रसरण:-
एकदा शिरकावं झाल्यानंतर त्यांचं प्रसरण ते स्वतःहून करत नाहीत,तर ते अनेक रसशोषक किडींच्या माध्यमातुन होते. उदा.पांढरी माशी, फुलकिडे, मावा, तुडतुडे.
विषाणूजन्य रोगाची लक्षणे:-
* विषाणूजन्य रोगाची लक्षणे ही मुख्यतः झाडाच्या वरील भागात पानांवर दिसतात.
* पानांच्या कडा आखडायला सुरवात होते, शेंडा व कोवळी पाने सुरकुतून जातात.
* भेंडीवर येणारा येल्लो व्हेन मोझ्याक पहिला तर त्यामध्ये पानांच्या शिरा पूर्ण पिवळ्या होतात.झाडाची उंची खुंटते.फळे लागत नाहीत किंवा लागली तर आकाराने खूप लहान असतात.
* सर्वात मुख्य आणि लवकर दिसणारे लक्षण म्हणजे पाने आखडून जाणे.
प्रतिबंधात्मक उपाय:-
* कोणत्याही पीकाची लागवड करण्याआधी त्यामध्ये येणाऱ्या विषाणूजन्य रोगांची माहिती घ्यावी.
* जर एखाद्या क्षेत्रामध्ये विषाणूजन्य रोगाचा सतत प्रादुर्भाव होत असल्यास त्याठिकाणी पिकांची फेरपालट करणे आवश्यक आहे.
* जे पिक घ्यावयाचे आहे त्याचे विषाणूसाठी रोगप्रतिकारक वाणाची लागवडीसाठी निवड करावी.
* लागवड केल्यानंतर पहिल्या आठवड्यातच एकरी 30 ते 40 पिवळे व निळे चिकट सापळे लावून घ्यावेत.तीन पिवळ्या सापळ्यामध्ये एक निळा या प्रमाणात लावून घ्यावेत.यामुळे रसशोषक किडीची संख्या कमी होईल व रोग प्रसारणास आळा बसेल.
* शेत नेहमी तण विरहित ठेवावे, जेणेकरून रसशोषक किडीना लपण्यास जागा मिळणार नाही.
* सापळा पिकांच्या लागवडी सही मुळे सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. जसे पांढर्या माशीच्या नियंत्रणासाठी भेंडीमध्ये झेंडूची लागवड चांगले काम करते.
* पहिली फवारणीचा ही नेहमी निम तेलाची असावी पिकानुसार निम तेलाची तीव्रता बदलते.त्यानुसार निम तेल निवडावे.पानावरील कडवट थरामुळे रसशोषक किडींवर मोठ्या प्रमाणात पिकापासून परावर्तित होतात.
* पिकास योग्य खते योग्य वेळी द्यावीत.नत्रयुक्त खताचा अतिवापर कटाक्षाने टाळावा. कारण त्यांच्या अतिवापरामुळे झाड कोवळे होते. हाच कोवळापणा किडींना आवडतो व त्या मोठ्या प्रमाणात शेतावर येतात.म्हणूनच नत्रयुक्त खतांचा वापर संतुलित ठेवावा.
* इतके करूनही एखाद्या झाडावर विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसू लागताच ते झाड शेताबाहेर नष्ट करावे.
* रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जाणवत असल्यास कीटकनाशकांचा वापर करून किडींचे नियंत्रित केल्यास पिकामध्ये रोगाला रोखण्यास मदत होते.
स्रोत- कृषी जागरण आणि इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
सचिन भालेराव, राहता अ.नगर
अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती
प्रविणा बर्डे, अकोला
विश्वजित जगताप, खानापूर सांगली
दिव्याकुमार भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
ओमकार मासाकल्ले, देवणी लातूर
संजय कांबळे, नंद्याळ कागल कोल्हापूर
दिनेश राजपूत, छ. संभाजीनगर
भागीनाथ आसने, अ. नगर
राजेश शेषराव ठाकरे, काटोल नागपूर
शरद दत्तात्रेय पाटील मू.पो अकुलखेडा ता चोपडा जि जळगाव
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #gogreen # disease #viral_disease #preventive_measures #farming #smartfarm
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा