पांढरी माशी। जीवनचक्र, नुकसान आणि व्यवस्थापन । White Fly Management |
टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी आणि इतर सर्व भाजीपाला पिके तसेच पपई, केळी यासारख्या पिकामध्ये वेगवेगळ्या किडींच्या मुळे मोठे नुकसान होते. त्यापैकी हमखास प्रादुर्भाव करणारी कीड म्हणजे पांढरी माशी.
पांढरी माशी पिकामध्ये पानांच्या मागच्या बाजूला राहून पानांमधून रस शोषण करते त्यामुळे पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो तसेच विषाणू जनित रोगांचा प्रसारसुद्धा रस शोषक किडींच्या माध्यमातून होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. तर आज आपण या पांढऱ्या माशीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.
पांढरी माशी
हि एक जवळपास भाजीपाला आणि इतर जवळपास सर्वच पिकामध्ये येणारी कीड आहे. या पांढऱ्या माशीचे शास्त्रीय नाव बेंमेसिया टॅबसी आहे. पांढरी माशी ही रसशोषक किड पिकांमधील पानाचा रस शोषून पिकाला नुकसान पोहोचवते.
जीवनचक्र:-
पांढऱ्या माशीची एक पिढी चार अवस्थांमधून जाते. मादी पांढरी माशी पानाच्या खालच्या बाजूने वर्तुळाकार पद्धतीने अंडे घालते. या अंड्यांमधून पाच ते नऊ दिवसांमध्ये पिल्ले बाहेर येतात. ही पिले चार अवस्थांतून कोषावस्थेमध्ये जातात. कोष पानाच्या खालच्या बाजूने तयार केले जातात. कोषावस्थेचा कालावधी कमी असतो. कोषांमधून बाहेर पडणाऱ्या माशीचा रंग पिवळा असून, त्यांचे पंख पांढरे असतात. अशा प्रकारे पांढऱ्या माशीचा संपूर्ण जीवनक्रम 16 ते 31 दिवसांमध्ये पूर्ण होतो.
नुकसान:-
* पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
* या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही आणि पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे खूप जास्त आवश्यक बनते.
* झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडली जातात. उत्पादनात घट येते.
* या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
* टोमॅटो पिकामध्ये बोकड्या किंवा पिवळा पर्णगुच्छ रोग (टीवायएलसीव्ही) तर कारली, खरबूज, कलिंगड, भोपळा यासारख्या पिकामध्ये यलोव्हेन मोझॅक हा विषाणू जनित रोग पसरवतात.
एकात्मिक कीड व्यवस्थापन
* वाणाची निवड करताना लवकर पक्व होणाऱ्या संकरित आणि पांढरी माशीला प्रतिकारक अशा वाणांची निवड करावी.
* पांढरी माशी वेगवेगळ्या तणांवरही जिवंत राहू शकतात त्यामुळे शेत आणि बांध तणमुक्त ठेवावेत.
* ओळींमधील आणि झाडांमधील अंतर योग्य प्रमाणात ठेवावे. त्यामुळे पिकामध्ये हवा खेळती राहून पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी राहतो.
* नत्रयुक्त खतांचा वापर मर्यादित करावा कारण त्यामुळे झाडाची शाखीय वाढ होते त्यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो.
* पिवळ्या रंगाकडे पांढरी माशी आकर्षित होते. त्यामुळे पिवळ्या रंगाचे चिकट सापळे प्रति एकरी 40-50 या प्रमाणात लावावेत.
* निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरॅक्टीन (दहा हजार पीपीएम) २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास किडीची अंडी आणि पिले नष्ट होतात.
* जैविक नियंत्रणामध्ये व्हर्टिसिलिअम लेकॅनी 1 किलो प्रति एकरी या प्रमाणात फवारणी करावी.
* किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत असेल तर इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.५ मिलि. किंवा थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूपी) ०.४ ग्रॅम. किंवा सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओडी) १.२ मिलि. प्रति लिटर पाण्यामधून फवारणी करावी
* रासायनिक कीटकनाशकांचा शिफारशीत प्रमाणात आणि आलटून पालटून वापर करावा. त्यामुळे किडींमध्ये एकाच कीटकनाशकासाठी प्रतिरोध तयार होणार नाही.
स्रोत - अग्रोवोन आणि इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
दिव्याकुमार भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
संकेत लब्दे, देवगड सिंधुदुर्ग
दिनेश राजपूत, छ. संभाजीनगर
अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती
पुंडलिक कैलास तांदळे, चाकूर लातूर
ओमकार मासाकल्ले, देवणी लातूर
काकासाहेब कुंभार, खडकेवाडा कागल
मनोज मधुकर मानापुरे, मौशी नागभीर चंद्रपूर
विजय माने,
भागीनाथ आसने, अ. नगर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #gogreen #agriculture #pest #whitefly #management #pestmanagement #farming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा