टोमॅटोमधील नागअळी । नुकसान आणि नियंत्रण । Management of Tuta Leafminer |
टोमॅटो पिकामध्ये तसे बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो ज्यामुळे पिकाचे अधिक नुकसान होते. त्यामधील सध्या टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या नागअळी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ज्या ठराविक भागात टोमॅटो पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्या क्षेत्रामध्ये तर किडीमुळे खूप नुकसान दिसून येत आहे. वेळेत उपाययोजना न अवलंबल्यास संपूर्ण प्लॉट सुद्धा हातचा जाऊ शकतो. त्यामुळे जे शेतकरी टोमॅटो पिकवतात त्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागण करण्याअगोदर पासून किडीच्या नियंत्रणासाठी महत्वाच्या गोष्टीचा योग्य वेळी वापर करून होणारे नुकसान टाळता येईल. तर आज आपण टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या याच नागअळीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण कसे करता येईल याची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
टोमॅटो पिकामध्ये येणारी नागअळी:-
या किडीचे शास्त्रीय नाव टूटा अबसोल्यूटा असून हि प्रामुख्याने टोमॅटो पिकामध्ये आणि त्यानंतर बटाटा पिकामध्ये सुद्धा प्रादुर्भाव करू शकते.
किडीचे जीवनचक्र:-
किडीचे पतंग लहान आकाराचे आणि तपकिरी रंगाचे असून पिकामध्ये पानांच्या मागच्या बाजूला लपून राहतात. मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूला, फांदीवर, कोवळ्या शेंड्यावर साधारणपणे २०० ते २५० अंडी देते. अंड्यामधून बाहेर आलेली अळी पानाच्या मधून हरितद्रव्य खायला सुरुवात करते. पूर्ण वाढ झालेली अळी फळाला सुद्धा नुकसान पोहोचवू शकते. साधारण १० ते १५ दिवस पिकाचे नुकसान करून अळी पानमध्येच किंवा जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. ८-१० दिवसांनी कोषामधून पुन्हा पतंग बाहेर पडतो. किडीचे संपूर्ण जीवनचक्र २५-३० दिवसात पूर्ण होते.
नुकसान:-
* शेंड्याकडील पानांवर तसेच कोवळ्या फळांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
* अळी अवस्था जास्त नुकसानकारक असून, अंड्यातून बाहेर पडताच लगेच कोवळी पानां मध्ये शिरून पानांच्या मधील हरितद्रव्ये खाते.
* अळी पानांमध्ये हरितद्रव्य खाल्यामुळे सर्पाकृती रेषा पानांवर दिसून येतात.
* कोवळ्या फांद्या आणि फळांमध्ये प्रवेश करून नुकसान करते. कच्चा फळांमध्ये लहान छिद्रे दिसून येतात.
* फळांच्या देठाजवळील विष्ठेवरून तसेच छोट्या छिद्रांवरून टुटा अळीचा प्रादुर्भाव ओळखून येतो.
* प्रादुर्भावग्रस्त फळांना बाजारपेठेत विक्रीसाठी चांगला भाव मिळत नाही.
एकात्मिक कीड व्यवस्थापन:-
• पीक लागणीच्या अगोदर शेताची चांगलंही मशागत करून घ्यावी म्हणजे शेतामध्ये असणारे किडीची सुप्तावस्था नष्ट होईल.
• शेतामध्ये नागअळीचा प्रवेश नैसर्गिकरित्या किंवा नर्सरीतून येणाऱ्या रोपांमधून होत असतो.त्यामुळेच प्रतिबंध उपाय करणे खूप महत्वाचे असते.
• सुरवातीस प्रादुर्भाव कमी असताना पांढऱ्या सर्पाकृती रेषा दिसणारी पाने काढून शेताबाहेर नष्ट करावीत.
• तसेच शेत व बांध नेहमी तणमुक्त ठेवावे. कारण पीक नसताना काही तणांवरही कीड उपजीविका करून करून जिवंत राहू शकते.
• शेतामध्ये रोपांची लागण केल्यानंतर लगेच एक दोन दिवसात एकरी 10 ते 12 कामगंध सापळे (टू टॉम ल्युर आणि वॉटर ट्रॅप) लावून पिकातील किडीचे प्रमाण व किडीचे नियंत्रण ही करू शकतो. या सापळ्यामध्ये नर पतंगांना पकडून त्यांचे जीवनचक्र तोडले जाते.
• त्याचबरोबर बॅसीलस थुरेंजेनेसिस युक्त कीटकनाशके, निम तेल, निंबोळी अर्क यांची फवारणी करावी ज्यामुळे लहान अवस्थेत असणाऱ्या अळ्या, अंडीपुंज नष्ट होतील.
• जेव्हा इतर सर्व पद्धती वापरून सुद्धा कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर जात असल्यास रासायनिक कीटक नाशकांचा वापर करावा. जसे स्पिनोसीन, इन्डोक्सिकार्ब, इमामेक्टीन बेंझोएट.
• एकाच रासायनिक कीटकनाशकांचा वापर पुन्हा पुन्हा न करता आलटून पालटून वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करावा.
• रासायनिक कीटकनाशके वापरताना लेबल क्लेम नक्की तपासा.
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
दिनेश राजपूत, छ. संभाजीनगर
राजेश शेषराव ठाकरे, काटोल नागपूर
ओमकार मासाकल्ले, देवणी लातूर
अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती
दिव्याकुमार भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
संजय कांबळे, नंद्याळ कागल कोल्हापूर
सचिन भालेराव, राहता अ.नगर
सुनील कुलकर्णी, मेहकर भालकी बिदर कर्नाटक
भागीनाथ आसने, अ. नगर
आदित्य मोरे,
विश्वजित जगताप, खानापूर सांगली
प्रविणा बर्डे, अकोला
अविनाश गुणे, पुणे
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #tomato #pest #tomatofarming #leafminer #tutaaboluta #management #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा