निंबोळी पेंड/खताचे फायदे । सेंद्रिय खत । Benefits of Neem Fertilizer

 



सध्या चालू असलेला भरमसाठ रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकांचे शरीरावर होणारे विपरीत परिणाम जाणून बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाळू लागले आहेत. सेंद्रिय शेती करताना सेंद्रिय गोष्टींचा वापर अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये शेणखत, गांडूळ खत, निंबोळी खत, कंपोस्ट खत यासोबत निमतेल, दशपर्णी अर्क, वेगवेगळे जैविक खतांचा, औषधांचा उपयोग सेंद्रिय खेती करताना अतिशय महत्वाचा ठरू शकतो. 

  सेंद्रिय शेतीमध्ये निंबोळी खत/निंबोळी पासून तयार केलेल्या खताचा औषधांचा उपयोग अतिशय महत्वाचा ठरतो. कडूलिंबाचा लिंबोळ्या या पासून निंबोळी पेंड तयार केली जाते. ऑरगॅनिक स्वरूपाचे खत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी या खताला आहे तसेच सेंद्रिय शेती साठी अत्यंत आवश्यक अशी ही निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंड ही फळबागायतदार कांदा उत्पादक शेतकरी आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी वर्गाला खूप आवश्यक आहे.


निंबोळी पेंडचा शेतात वापर:- 

 निंबोळी पेंड शेणखत तसेच इतर सेंद्रिय खतांसोबत वापरण्यास अतिशय सुलभ आहे. रासायनिक खतांच्या बेसल डोसमध्ये देखील वापरता येते. निंबोळी पेंड मुळांच्या कार्यक्षेत्रात व्यवस्थित पोहचेल अशा पध्दतीने टाकावी. फळझाडांमध्ये मुळांच्या जवळ ड्रिपरजवळ खड्डा घेउन त्यात निंबोळी पेंड टाकून मातीने बुजवुन घ्यावी. शेत तयार करताना देखील निंबोळी पेंडचा वापर करता येईल किंवा उभ्या पिकात निंबोळी पेंड फ़ोकुन, हाताने पसरवुन देता येते. 

भाजीपाला पिकामध्ये बेडमध्ये बेसल डोस टाकताना निंबोली पेंडचा वापर करता येतो. जैविक कीडनाशके-जैविक खते निंबोळी पेंडसोबत सुलभरित्या वापरता येतात. ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, बिव्हेरिया, मेटारायझियम, पॅसिलोमायसिस, अ‍ॅझोटॊबॅक्टर, पिएसबी, केएमबी सारख्या उपयुक्त सुक्ष्मजिंवांचा वापर निंबोळी पेंडीला चोळून किंवा सोबत मिक्स करुन करता येतो. 


निंबोळी पेंडीचे फायदे:-

* एक्पेलरमधून तेल न काढता तयार होणारी निंबोळी पेंड जास्त फ़ायदेशीर असते. यात निंबोळी मधील अ‍ॅझाडीरेक्टिन, निम्बीन, सलानिन हे घटक १०० ते १००० पिपिएमपर्यंत तसेच सिलिका १५% सह इतर उपयोगी तत्व आलेले असतात. यात ५ ते ७ टक्के तेल असते. त्यामुळे कीटकनाशक गुणधर्मासह इतर अन्नद्रव्ये शेतात मिसळले जातात.

* यामध्ये नत्र ३- ५%, स्फ़ुरद १% पालाश २% या प्रमाणात असून पिकांच्या मुळांना हळुहळू उपलब्ध होतो. 

* कडूनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये गेल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात. या पद्धतीमुळे जमीनीतील वावरणा-या किडींचे तसेच पिकांवरील रसशोषक किडींचे देखील नियंत्रण होते. 

* जमिनीमध्ये वास्तव्य करणा-या हानिकारक किडी जसे मुळे कुरतडणा-या अळ्य़ा, हुमणी यांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. 

* तसेच भाजीपाला पिकांवर डाळींब पिकाच्या मुळांवर गाठी करणा-या हानिकारक सुत्रकृमींचादेखील बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो.

 * वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी पासून पिकांचे संरक्षण होते. आणि पिके रोगराई ला बळी पडत नाहीत.

* शेतात निंबोळी पेंड घातल्यामुळे पिक वाढीस फायदा होतो, त्याचबरोबर पिकाला अनेक वर्षे पर्यंत अन्नपुरवठा करत राहतात त्यामुळे इतर खतापेक्षा निंबोळी पेंड फायदेशीर ठरते.

* उपयुक्त असणाऱ्या जमिनीतील सूक्ष्म जिवाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे शेतात निंबोळी पेंड घालावी

* शेतात सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि शेतातील मातीची सुपीकता वाढते.

* निंबोळी खताच्या वापरामुळे पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.

* पिकांमध्ये निंबोळी पेंड वापरल्यानंतर ३ ते ६ आठवड्यात त्याचे फ़ायदे दिसू लागतात. निंबोळी पेंडमधील घटक जमिनीत हळूहळू काम करत असल्यामुळे सहा महिन्यांपर्यंत याचा परिणाम दिसून येतो.

स्रोत-अग्रो स्टार आणि इंटरनेट 

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

ओमकार मासाकल्ले, लातूर

विश्वजित जगताप, खानापूर सांगली

किरण मगदूम,

भागीनाथ आसने, अ. नगर 

हेमांगी 

 सुनील कुलकर्णी, भालकी बिदर कर्नाटक 

राजेश शेषराव ठाकरे, काटोल नागपूर 

दिव्याकुमार विद्याधर भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर

दर्शन अरुणराव ठाकरे, वरुड अमरावती 

दिनेश राजपूत, छ. संभाजीनगर 

  उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद


*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipm_school #IPM #gogreen #farming #neemfertilizer #organic #fertilizers #benefits 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing

मिरची पिकामध्ये थ्रिप्स नियंत्रण । एकात्मिक व्यवस्थापन पद्धती । Thrips Management

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |