पिकामध्ये येणाऱ्या किडींसाठी प्रतिबंधात्मक उपाय । एकात्मिक कीड व्यवस्थापन । IPM
शेतकऱ्याला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागते ते म्हणजे पिकामध्ये कीड आणि रोग यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानाला. अगदी सुरुवातीपासून यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे शेतकरी पिकामध्ये किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करताना दिसून येतात.
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा उपयोग केल्यास चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण होऊन खर्च आणि पिकाचे नुकसान वाचवू शकतो. तर आज आपण पिकामध्ये कीड येऊ नये म्हणून किडींच्या प्रतिबंधासाठी कोणकोणते उपाय करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत.
पिकामध्ये येणाऱ्या किडींसाठी प्रतिबंधक उपाय:-
मशागत
जमिनीची मशागत केल्यामुळे जमिनीमध्ये असणारी कीड, किडीचे कोष जमिनीच्या बाहेर येतात आणि एकतर पक्षी त्यांना वेचून खातात किंवा प्रखर उन्हामुळे नष्ट होतात त्यामुळे पुढील पिकामध्ये येणारी किड काही प्रमाणात कमी होते.
जुन्या पिकाच्या अवशेषांची विल्हेवाट
त्या जमिनीमध्ये असणारे जुन्या पिकाचे अवशेष, कीड आणि रोगग्रस्त रोपे नष्ट करणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. कारण त्यावर कीड जिवंत राहून ज्यावेळी पुढे मुख्य पीक घेतले जाते त्यावेळी किडीचे प्रमाण वाढू शकते.
तण नियंत्रण
शेतामध्ये असणारे तसेच आजुबाजुचक्या बांधावर असणाऱ्या तणांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे त्या माध्यमातूनही चांगल्या पद्धतीने किडीला प्रतिबंध करू शकतो कारण ज्यावेळी शेतामध्ये पीक उपलब्ध नसेल त्यावेळी कीड आसपासच्या तणांवर जिवंत राहते आणि नंतर मुख्य पिकाला मोठया प्रमाणात नुकसान पोहोचवते.
बीजप्रक्रिया
शेतामध्ये पीक लागवडीवेळी म्हणजेच टोकण करायचे असल्यास बियाण्याला बीजप्रक्रिया आणि रोप लागण करताना रोप प्रक्रिया (कीटकनाशक आणि बुरशीनाशक) केल्यास सुरुवातीच्या अवस्थेंमध्ये नुकसान करणाऱ्या किडींना/रोगांना प्रतिबंध चांगल्या पद्धतीने करू शकतो.
रोपांमधील अंतर
पिकामध्ये किडींना प्रतिबंध करण्यासाठी दोन रोपांमधील अंतर योग्य ठेवणे गरजेचे आहे. कारण रोपांमधील अंतर कमी झाले तर आणि पिकाची दाटी जास्त झाल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि नियंत्रण उपाय करणेही कठीण जाते.
सापळा पिकांचा वापर
शेतामध्ये जे मुख्य पीक घेतले जाणार आहे त्यामध्ये येणाऱ्या किडींचा अभ्यास करून योग्य त्या सापळा पिकाची लागवड करणेही खूप महत्वाचे आहे. यामध्ये कोबी/फ्लॉवर पिकासाठी तीळ हे पीक डायमंड बॅक मॉथ साठी सापळा पीक म्हणून काम करेल, सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या पाने खाणाऱ्या अळीसाठी एरंड हे सापळा पीक म्हणून चांगले काम करेल. अश्या पद्धतीने मुख्य पीक आणि त्यामध्ये येणाऱ्या किडींना अनुसरून योग्य सापळा पीकही कीड प्रतिबंधासाठी खूप चांगले काम करेल.
कामगंध सापळ्यांचा उपयोग
पिकामध्ये येणाऱ्या किडींच्या बंदोबस्तासाठी कामगंध सापळ्यांचा उपयोग अतिशय परिणाम कारक ठरेल. पिकामध्ये येणाऱ्या किडींसाठी योग्य तो कामगंध सापळा उपयोग केल्यास सुरुवातीला कीड प्रादुर्भाव समजेल आणि त्यानंतर किड नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करता येतील.
जैविक घटकांचा वापर
किडीच्या प्रतिबंधासाठी जैविक घटकांचा उपयोग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. यामध्ये सुरुवातीला भेसळ खतांसोबत निंबोळी खत जमिनीमधून लागणारे कीड आणि सूत्रकृमींचा अतिशय चांगले काम करते. त्यासोबत नीम तेलाची फवारणी केल्यास किडीचे पतंग पिकापासून परावर्तित होतात त्यामुळे जैविक घटकही कीड प्रतिबंधक म्हणून अतिशय चांगले काम करतात.
यासारख्या शक्य त्या सर्व गोष्टींचा उपयोग पिकामध्ये येणाऱ्या किडींच्या प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करून किडींमुळे पिकाचे होणारे नुकसान कमी करू शकतो आणि त्याचबरोबर योग्य आणि कमी खर्चिक असे प्रभावी कीड नियंत्रण करू शकतो.
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
ओमकार मसकल्ले, देवणी लातूर
भागीनाथ आसने, अ. नगर
आनंद भास्करराव अजमीरे, हिवरखेड मोर्शी अमरावती
विशाल कऱ्हाळे, नांदेड
दिव्याकुमार विद्याधर भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
संजय कांबळे, नंद्याळ कागल कोल्हापूर
विश्वजित जगताप, खानापूर सांगली
दिनेश राजपूत, छ. संभाजीनगर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #gogreen #pest #management #preventive #methods #technique #agriculture #farming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा