नारळामधील कीड । गेंड्या भुंगा नुकसान आणि व्यवस्थापन । Rhinoceros Beetle ।
नारळाचे पीक काही भागामध्ये व्यवसाय म्हणून घेतले जाते तर काही शेतकरी नारळाची काही झाडे बांधावर लावतात. ज्यामुळे त्यांना गरज पडणारे नारळ त्यांना बाजारातून विकत घ्यावे लागणार नाहीत. नारळाच्या झाडाचे काही कारणामुळे नुकसान होते, त्यामध्ये काही कारणामुळे झाडाचे नुकसान होऊन त्याचा परिणाम फळ लागणीवर हि होतो.
नारळ झाडाचे प्रामुख्याने नुकसान हे किडींमुळे होते, यामध्ये गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा, पाने खाणारी काळ्या डोक्याची अळी, वाळवी, एरिओफाईट कोळी, यासारख्या किडींचा समावेश होतो.
वरील फोटोमध्ये दिसणारे हे नुकसान गेंडा भुंगा या किडीमुळे झालेले आहे. आज आपण हि कीड नुकसान कशा प्रकारे करते आणि त्याचे नियंत्रण उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.
गेंडा (भुंगा) बीटल ज्याचं शास्त्रीय नाव ओरेक्टेस ऱ्हिनोसेरॉस आहे. या भुंग्यांचा प्रादुर्भाव वर्षभर असतो पण परंतु जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांची संख्या सर्वाधिक असते.
नुकसान
* पाने कोवळी आणि पोंग्यात असताना कट करतो ज्यामुळे आपल्याला नंतर पाने हि त्रिकोणी आकारामध्ये कट झालेली दिसतात.
* त्याचबरोबर बऱ्याच वेळेस पानांच्या मधील जाडसर भागाला छिद्रे पडलेली सुद्धा दिसून येतात.
* काही वेळेस पाने पोखरलेली दिसतात ज्यामुळे नारळाची पाने मधून कट होतात आणि पुढील भाग वाळून जातो.
* वेळीच लक्ष न दिल्यास झाडाच्या पानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. ज्यामुळे उत्पादनावरही परिणाम होतो.
* किडीमुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात १० ते १५% घट होते.
व्यवस्थापन:
* बागेमध्ये किंवा झाडाच्या आसपास शेतामध्ये चांगली स्वच्छता राखावी. मेलेली झाडे काढून नष्ट करावीत ज्यामुळे किडींना अंडी घालण्यासाठी जागा मिळणार नाही.
* नारळाच्या कोवळ्या भागामध्ये पोखरलेला छिद्र दिसत असेल तर तारेच्या हूकच्या मदतीने काढून मारावेत.
* उन्हाळा आणि पावसाळ्यात पहिल्या पावसानंतर प्रौढ बीटलना आकर्षित करण्यासाठी आणि मारण्यासाठी प्रकाश सापळे लावा.
* भुंग्यांच्या अळी अवस्था नष्ट करण्यासाठी एंटोमोपॅथोजेन म्हणजेच बुरशी (मेटारायझियम अॅनिसोप्लिया) खताच्या खड्ड्यांमध्ये घालावे.
* गेंड्या भुंग्यांना पकडण्यासाठी बीटल ल्यूर आणि बकेट ट्रॅप फेरोमोन सापळा प्रति एकर ४-५ लावा. आठवड्यातून एकदा सापळ्यातील किटकांची विल्हेवाट लावा. तर प्रत्येक ३-४ महिन्यानंतर ट्रॅप मधील ल्युर बदलावी.
* बॅक्युलोव्हायरस ऑरिक्टिसने १५ बीटल / हेक्टर या प्रमाणात प्रौढ गेंड्यांच्या किटकांना शेतात सोडल्याने या किडीमुळे होणारे पानांचे आणि मुकुटाचे नुकसान कमी होते.
* एरंडेल केक १ किलो ५ लिटर पाण्यात लहान मातीच्या कुंड्यांमध्ये भिजवा आणि प्रौढांना आकर्षित करण्यासाठी आणि मारण्यासाठी नारळाच्या बागेत ठेवा.
* प्रतिबंधक उपाय म्हणून सर्वात वरच्या तीन पानांमध्ये सेव्हिडॉल ८ जी २५ ग्रॅम + बारीक वाळू २०० ग्रॅम, जे एप्रिल-मे, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये वर्षातून तीनदा हे मिश्रण भारत येते.
* किंवा फोरेट १० जी ५ ग्रॅम छिद्रित पिशव्यांमध्ये दोन आतील सर्वात पानांच्या अक्षांमध्ये ६ महिन्यांच्या अंतराने २ वेळा ठेवा.
* सुरुवातीपासून एकात्मिक व्यवस्थापनावर भर द्यावा आणि त्यानंतर गरज लागल्यास रासायनिक कीटकनाशकांचा आधार घेऊन किडीचे नियंत्रण करावे.
स्रोत-TNAU ब्लॉग
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
विश्वजित जगताप, खानापूर सांगली
निखिल मधुकर तेटू, कुऱ्हा अमरावती
दिव्याकुमार विद्याधर भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर
आनंद भास्करराव अजमीरे, हिवरखेड मोर्शी अमरावती
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm_school #IPM #gogreen #coconut #pest #rhinocerous_beetle #pestmanagement #coconutfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा