उन्हाळ्यात पिकांची काळजी घेताना येणाऱ्या समस्या । Summer Vegetables

 



उन्हाळ्यामध्ये शेतकरी वेगवेगळी पिके घेताना दिसून येतात. ऊसासारख्या नगदी पिकांबरोबरच बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला तसे वेलवर्गीय भाजीपाला देखील पिकवतात. वेगवेगळ्या भागांनुसार पिके जरी बदलत असली तरी उन्हाळ्यामध्ये सर्वच पिकांची काळजी घेताना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. 

  एकतर उन्हाळ्यामधील कडक उन्हाचा कोवळ्या भाजीपाला पिकावर अधिक परिणाम दिसून येतो आणि त्यामध्ये पाणी व्यवस्थापन करताना अडचण अली तर खुप अधिक नुकसानाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आज आपण उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला कोणकोणत्या समस्या येतात याबद्दल माहिती घेणार आहोत. 

उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या समस्या:-

पाण्याची कमतरता:- 

उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता कमी होते, ज्यामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे पिकांचे उत्पादन घटते किंवा पीक पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते. सिंचनासाठी जास्त खर्च करावा लागतो किंवा पाण्याचा पुरवठा कमी असल्याने सिंचन करणे कठीण होते.

उष्णतेमुळे होणारे पिकांचे नुकसान:- 

वाढत्या तापमानामुळे पिकांवर ताण येतो, ज्यामुळे पिके सुकतात किंवा त्यांचे उत्पादन कमी होते. काही पिके उष्णतेमुळे लवकर पिकतात किंवा त्यांचे गुणधर्म बदलतात. पिकांच्या पानांवर डाग पडतात किंवा पीक पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते.

कीटकांचे प्रमाण वाढणे:- 

उन्हाळ्यात कीटकांची संख्या वाढते, ज्यामुळे पिकांना धोका निर्माण होतो. उन्हाळ्यात कीटकांचे जीवनचक्र लवकर पूर्ण होते त्यामुळे किडींच्या संख्येमध्ये जलद वाढ होते. काही कीटक पिकांच्या पानांवर किंवा फळांवर हल्ला करतात, ज्यामुळे पिकांचे नुकसान होते. आणि या 

बाजारभावातील चढ-उतार:- 

उन्हाळ्यामध्ये काही पिकांची उपलब्धता कमी होते, ज्यामुळे त्यांची किंमत वाढते.

तर काही पिकांची उपलब्धता जास्त असल्याने त्यांची किंमत कमी होते.

त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते किंवा त्यांना आर्थिक नुकसान होते.

इतर समस्या:-

पाणी व्यवस्थापनात अडचणी आल्यामुळे खतांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करताना समस्या येतात. त्यामुळेही पिकाची वाढ आणि उत्पन्नामध्ये समस्या येऊ शकते. यासोबत ताण सहन करणाऱ्या पिकांची/वाणांची निवड करणे, कीड नियंत्रण आणि बाजारपेठेतील बदलांवर लक्ष ठेवणे, शेतमजुरांची उपलब्धता यासारख्या समस्यांवर देखील मात करावी लागते. 

त्यामुळे प्रामुख्याने या समस्यांचा विचार करून शेतकरी मित्रांनी योग्य ती काळजी पीक लागवडीपासून घेतल्यास उपलब्ध सर्व पर्यायांचा उपयोग करून पिकाचे होणारे नुकसान टाळून चांगल्या पद्धतीने पिकाची काळजी घेऊ शकतो.

संदर्भ - इंटरनेट 

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

संजय कांबळे, नंद्याळ कागल कोल्हापूर 

भागीनाथ आसने, अ. नगर

दिव्याकुमार विद्याधर भोसागे, जयसिंगपूर कोल्हापूर 

मनोज मानापुरे, चंद्रपूर 

अभिषेक खेरडे, अचलपूर अमरावती

   उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipm_school #IPM #gogreen #summer #summer_vegetables #problems #agriculture


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing