पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खरीप हंगाम | सर्वोत्तम भुईमूग जाती । Groundnut Best Variety

इमेज
  महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकांसोबतच भुईमुगाचे पीकसुद्धा बऱ्याच प्रमाणात घेतले जाते. तेलवर्गीय पिकामध्ये भुईमूग पिक कमी अधिक प्रमाणात संपूर्ण राज्यात घेतले जाते. खरीप हंगामासाठी भुईमुगाच्या अनेक चांगल्या जाती उपलब्ध आहेत, ज्या अधिक उत्पादन देतात आणि काही प्रमाणात रोग व किडींना सहनशील आहेत.  महाराष्ट्रासाठी खरीप हंगामातील भुईमुगाच्या काही सर्वोत्तम जाती: १. फुले प्रगती (फुले प्रगती/JL-24): * ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारी जात आहे. * जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राने ही जात विकसित केली आहे. * हे वाण मध्यम ते हलक्या जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. * परिपक्वतेचा कालावधी: साधारणपणे १०० ते ११० दिवसांत पीक तयार होते. * उत्पादन: प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन देते. * या जातीच्या शेंगांचा रंग फिकट पिवळा आणि दाण्याचा रंग लालसर गुलाबी असतो. प्रत्येक शेंगेत २ ते ३ दाणे असतात. २. फुले उन्नती (Phule Unnati/RSRG-6083): * महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ही एक सुधारित जात आहे. * हा उपटा (बंच) प...

सोयाबीन पीक । सुरुवातीला कीड नियंत्रणासाठी घ्यायची काळजी । IPM in Soyabean

इमेज
  खरीप हंगाम सध्या चालू झालेला आहे. खरीप हंगामामधील सर्वात महत्वाचे पीक म्हणजे सोयाबीन. काही ठिकाणी सोयाबीन टोकण पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी टोकणनी साठी गडबड चालू आहे.    खरीप हंगामामध्ये पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे सोयाबीन तसेच इतर सर्व पिकावर किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणावर दिसून येतो. अगदी सुरुवाती काळापासून कीड व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केल्यास शेतकऱ्याला चांगला फायदा मिळून खर्चही कमी होईल.  सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत घ्यायची काळजी:- सोयाबीन पिकामध्ये अगदी सुरुवातीपासून किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे बियाण्याला कीड आणि रोगापासून वाचवण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच सोयाबीन उगवाणी झाल्यानंतर किडींपासून वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास पिकाचे नुकसान वाचेल, कीड नियंत्रणासाठी खर्च कमी येईल तसेच शेतकऱ्यांचा त्रासही कमी होईल.    कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) चा उपयोग:- सोयाबीन पीक हे साधारणपणे दोन पानांची वाढ झाली असताना पिकामध्ये पाने खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे सोयाबीन टोकणी झाली...

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

इमेज
  हुमणी एक अतिशय नुकसानकारक आणि नियंत्रणासाठी कठीण अशी एक कीड आहे जी शेतकऱ्याचे ऊस, भुईमूग, बटाटा, सोयाबीन यासारख्या नगदी  तसेच भाजीपाला पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. हुमणी हि खरीप हंगामामध्ये अधिक सक्रिय असल्यामुळे नियंत्रण उपाय करणे खूप कठीण होते. हुमणी किडीमुळे पिकाचे ३० से ८० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते.     हुमणी कीड जमिनीमध्ये राहून पिकाच्या मुळाजवळ राहून नुकसान पोहोचवते. हि कीड जमिनीमध्ये असल्यामुळे नियंत्रण उपाय करताना खूप कठीण जाते. त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक बाबी नियंत्रणात्मक उपाय केल्यास किडीचे नियंत्रण नक्कीच शक्य आहे. तर आज आपण पाहूया कि त्यासाठी प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय कोणते करता येतील.                                                                         हुमणी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय :- हुमणी किडीचे साधारणपण...

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

इमेज
  खरीप हंगाम चालू व्हायला अगदी थोडासाच अवधी शिल्लक आहे. एकसारखा पडणाऱ्या वळीव पावसाने बऱ्याच दिवसानंतर मागील आठवड्यापासून थोडीशी उसंत दिली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी शेत तयार करायच्या गडबडीत आहेत. खरीप हंगामामधील पिकांमध्ये कीड आणि रोगांचे प्रमाण इतर हंगामापेक्षा अधिक असते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. पिकाची टोकण किंवा रोपलागण करताना बीजप्रक्रिया हि खूप महत्वाची आहे.  बीजप्रक्रिया म्हणजे बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी जमिनीतून तसेच बियाण्यातून विविध प्रकारचे रोग पसरू नयेत आणि रोगांचा प्रसार होऊ नये त्याचबरोबर रोपांची वाढ चांगली, एकसारखी होऊन उत्पादन वाढण्यासाठी जैविक आणि रासायनिक अश्या दोन्ही पद्धतीने बीजप्रक्रिया केली जाते.    बीजप्रक्रिया करताना अगोदर रासायनिक औषधांची आणि त्यानंतर जैविक औषधांची प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना अगोदर इमिडाक्लोप्रिड (कीटकनाशक) आणि त्यानंतर कार्बेन्डाझिम (बुरशीनाशक) यांची बीजप्रक्रिया करून त्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करावी. जैविक बीजप्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा, रायझोबियम, अझाटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळ...