सोयाबीन पीक । सुरुवातीला कीड नियंत्रणासाठी घ्यायची काळजी । IPM in Soyabean
खरीप हंगाम सध्या चालू झालेला आहे. खरीप हंगामामधील सर्वात महत्वाचे पीक म्हणजे सोयाबीन. काही ठिकाणी सोयाबीन टोकण पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी टोकणनी साठी गडबड चालू आहे.
खरीप हंगामामध्ये पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे सोयाबीन तसेच इतर सर्व पिकावर किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणावर दिसून येतो. अगदी सुरुवाती काळापासून कीड व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केल्यास शेतकऱ्याला चांगला फायदा मिळून खर्चही कमी होईल.
सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत घ्यायची काळजी:-
सोयाबीन पिकामध्ये अगदी सुरुवातीपासून किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे बियाण्याला कीड आणि रोगापासून वाचवण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच सोयाबीन उगवाणी झाल्यानंतर किडींपासून वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास पिकाचे नुकसान वाचेल, कीड नियंत्रणासाठी खर्च कमी येईल तसेच शेतकऱ्यांचा त्रासही कमी होईल.
कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) चा उपयोग:-
सोयाबीन पीक हे साधारणपणे दोन पानांची वाढ झाली असताना पिकामध्ये पाने खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे सोयाबीन टोकणी झाली कि साधारण ५-७ दिवसांमध्येच या किडीसाठी फेरोमोन ट्रॅपचा उपयोग करावा. त्यासाठी स्पोडो ल्युर आणि फनेल ट्रॅप एकरी १० या प्रमाणात उभे करावेत. हे ट्रॅप लावल्यामुळे किडीचे नर पतंग ट्रॅपमध्ये सापडून मादीसोबतचे त्यांचे मिलन थांबून जीवनचक्र तुटेल आणि अळी निर्माण होण्या अगोदरच किडीचे नियंत्रण होईल.
चिकट सापळ्यांचा वापर:-
सोयाबीन पिकामध्ये पांढरी माशी, तुडतुडे, मावा यासारख्या अनेक रसशोषक किडींचा सोयाबीन पिकामध्ये प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे पीक उगवणी झाल्यानंतर पिवळे आणि निळे चिकट सापळे प्रति एकरी ४०-५० या प्रमाणात लावणे गरजेचे आहे. पिकामध्ये चिकट सापळे लावताना ४ पिवळ्या चिकट संपल्यानंतर १ निळा चिकट सापळा या पद्धतीने लावणे गरजेचे आहे. या चिकट संपल्यामुळे सर्व रसशोषक किडींचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने होईल. तसेच रसशोषक किडींपासून पसरणारे विषाणू जनित रोगाचा प्रसार रोखण्यास पण मदत होते.
निम तेलाचा उपयोग:-
पिकामध्ये सुरुवातीपासून किडींचा प्रादुर्भाव कमी राहावा यासाठी पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून निम तेलाची फवारणी करणे फायदेशीर ठरते. निम तेलाची फवारणी केल्यामुळे किडीचे पतंग पिकापासून दूर परावर्तित होतात, किडींची अंडी तसेच लहान अळया यांचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे दर १०-१५ दिवसांच्या अंतराने पिकामध्ये निम तेलाची फवारणी करावी.
पक्षी थांबे उभे करणे:-
पिकामध्ये साधारणपणे १०-१५ पक्षीथांबे उभे करावेत. यामुळे पक्षी शेतामध्ये जागोजागी थांबतील आणि पिकामध्ये नुकसान करणाऱ्या अळ्या वेचून खातील आणि त्यामुळे कीड नियंत्रणामध्ये मदत होईल.
कीडग्रस्त भाग, अंडीपुंज काढून टाकणे:-
शेतात रोगग्रस्त किंवा किडींनी प्रादुर्भाव झालेली झाडे, पाने किंवा फांद्या दिसल्यास त्या लगेच काढून नष्ट करा.
जैविक कीटकनाशकांचा उपयोग:-
पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर जैविक कीटकनाशकांचा उपयोग प्रभावी ठरू शकतो. जर पिकामध्ये पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास SLNPV या विषाणूजन्य कीटकनाशकाचा उपयोग करू शकतो. तसेच रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलीम लेकॅनी या जैविक कीटकनाशकाचा वापर करू शकता.
जर किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर इथियॉन (५०%) ३० मिली प्रति १० लिटर पाणी किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८%) ६.७ मिली प्रति १० लिटर पाणी आलटून पालटून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळ्यांसाठी फेनवलरेट २० ईसी १७ मिली प्रति १० लिटर पाणी किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाणी फवारणी करावी.
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm #IPM #gogreen #soyabean #pest #prevention #pestmanagement #smartfarming #soyabeanfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा