रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest
पिकामध्ये वेगवेगळ्या किडींच्या मुळे नुकसान होताना पाहायला मिळते, त्यामध्ये पानांचे नुकसान करणारी कीड, खोडाला नुकसान पोहोचवणारी कीड, फळाला नुकसान पोहोचवणारी कीड आणि मुळाला नुकसान पोहोचवणाऱ्या या किडी पिकाला प्रत्यक्ष खाऊन नुकसान करतात तर पिकामध्ये रस शोषण करून पिकाला नुकसान करणाऱ्या किडींच्यामुळेही पिकाचे अधिक नुकसान होऊ शकते. रसशोषक किडी या शेतीतील पिकांसाठी अत्यंत हानिकारक असतात. यामध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स यासारख्या बऱ्याच किडी पिकाला नुकसान पोहोचवतात. या किडी पिकामध्ये राहून पानांमधून, खोडामधून रस शोषून घेतात, ज्यामुळे पिकाचे नुकसान होते. हे नुकसान केवळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही प्रकारे होते. रसशोषक किडीमुळे पिकाचे होणारे प्रत्यक्ष नुकसान:- रसशोषक किडी (उदा. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण इत्यादी) पानांमधून, कोवळ्या फांद्यांमधून, फुलांमधून किंवा फळांमधून रस शोषून घेतात. हा रस झाडाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे आणि पाणी वाहून नेतो. रस शोषल्यामुळे झाडाला आवश्यक पोषण मिळत नाही. यामुळे पिकावर...