हरभरा बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेमुळे मिळणारे फायदे । Seed Treatment Benefits
शेतकऱ्यांनी पेरणी करताना बीजप्रक्रिया करणे खूप महत्वाचे आहे. किमान ज्या पिकाला किडीचा रोगाचा प्रादुर्भाव जलद होऊन मोठे नुकसान होऊ शकते अश्या पिकासाठी तरी बीजप्रक्रिया केल्यास पुढे होणारे नुकसान टाळून चांगले उत्पादन शेतकरी घेऊ शकतात.
हरभरा पिकासाठी बीजप्रक्रिया खूप महत्वाची भूमिका बजावते. आज आपण हरभरा पेरणी करताना बीजप्रक्रिया केल्यास कोणते फायदे मिळतात याबद्दल माहिती घेणार आहोत.
हरभरा बीजप्रक्रिया:-
बीजप्रक्रिया करताना पहिल्यांदा रासायनिक बुरशीनाशक/कीटकनाशकांचा वापर करावा आणि त्यानंतर जैविक घटकांचा वापर करावा. हरभरा पिकामध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी
* कार्बेन्डाझिम + थायरम प्रत्येकी 2 ग्रॅम बियाणे व जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर त्वरित नियंत्रण. किंवा रासायनिक टेब्युकोनॅझोल 4 मिली प्रति 10 किलो बियाणे रोपाला मर रोगापासून दीर्घकाळ संरक्षण मिळते.
* जैविक ट्रायकोडर्मा व्हिरीडी 4 ते 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी जमिनीत वाढून रोगकारक फुझेरियम बुरशीला नष्ट करते.
* पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत रसशोषक किडी आणि खोडमाशीपासून वाचवण्यासाठी इमिडाक्लोप्रिड किंवा थायमेथोक्झाम या रासायनिक कीटकनाशकाचा 4 ते 6 मिली प्रति 1 किलो बियाणे वापर करावा.
* जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया (सर्वात शेवटी) यामुळे पिकाला पोषण मिळते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. संवर्धकप्रमाण (प्रति 10 किलो बियाणे) फायदे रायझोबियम 250 ग्रॅम आणि पीएसबी (PSB) 250 ग्रॅम यांची बीजप्रक्रिया करावी.
हरभरा पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संरक्षण मिळते आणि उत्पादनात मोठी वाढ होते.
हरभरा पेरणीअगोदर बीजप्रक्रिया केल्याचे फायदे :-
* पिकाचे संरक्षण आणि चांगली वाढ होते.
* मर रोग नियंत्रण: हरभऱ्यावरील मर रोग ही सर्वात मोठी समस्या आहे, जी जमिनीतील फुझेरियम (Fusarium) बुरशीमुळे होते. बीजप्रक्रिया केल्याने बुरशीनाशक बियाण्यावर संरक्षक कवच तयार करते, ज्यामुळे रोप उगवल्यापासूनच मर रोगापासून सुरक्षित राहते.
* इतर रोगांवर नियंत्रण: मूळ कूज (Root Rot) आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो, जे बियाणे किंवा जमिनीत असतात.
* सतेज व जोमदार वाढ: रोपे सुरुवातीलाच रोगमुक्त व निरोगी असल्यामुळे त्यांची वाढ सतेज आणि जोमदार होते.
* उगवण क्षमता वाढ: बीजप्रक्रिया केल्याने बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, ज्यामुळे शेतात एकसारखी रोपे वाढतात.
* उत्पादनात वाढ: रोगांपासून संरक्षण मिळाल्यामुळे आणि रोपे निरोगी असल्यामुळे पिकाच्या अंतिम उत्पादनात निश्चित वाढ होते.
* खर्चात बचत: पेरणीच्या सुरुवातीलाच रोग नियंत्रण केल्यामुळे, नंतर कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचे वारंवार फवारणी करण्याचे प्रमाण कमी होते आणि खर्चात बचत होते.
* कीड नियंत्रण: बुरशीनाशकासोबत कीटकनाशकाची प्रक्रिया केल्यास, रोपावस्थेत रसशोषक किडी (उदा. मावा) आणि खोडमाशी यांचा प्रादुर्भाव पहिल्या ३०-३५ दिवसांसाठी कमी होतो.
* नत्र स्थिरीकरण: हरभऱ्याला रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया केल्यास, हे जिवाणू हवेतील मुक्त नत्र शोषून घेऊन ते मुळांच्या गाठींमध्ये स्थिर करतात. यामुळे पिकाला नत्राची उपलब्धता वाढते आणि रासायनिक खतांची (उदा. युरिया) गरज कमी होते.
* स्फुरद उपलब्धता: स्फुरद विरघळणारे जिवाणू (PSB) संवर्धकाची प्रक्रिया केल्यास, जमिनीत असलेले स्फुरद (Phosphorus) पिकाला सहज उपलब्ध होते, जे मुळांच्या आणि फांद्यांच्या चांगल्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे.
फक्त बीजप्रक्रिया केल्याने जर एवढे फायदे मिळत असतील तर शेतकऱ्यांनी पेरणीअगोदर बीजप्रक्रिया करून नंतर होणारे नुकसान टाळून उत्पादनामध्ये वाढ नक्की करू शकतील.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
विकास धुमाळ, बेकनाळ गडहिंग्लज कोल्हापूर
दीपक, नागपूर
ओंकार शिवाजी जगदंबे, नांदेड
महादेव मगदूम, पन्हाळा कोल्हापूर
सत्यजित मिरपुरे, यवतमाळ
अविनाश सोनावणे,
शिव कापसे, परभणी
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #gram #bengalgram #seedtreatment #benefits #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा