मिरचीमधील थ्रिप्स कीड । नियंत्रणासाठी सोपे उपाय । Thrips Management in Chilli
साधारणपणे मिरची पिकाचे नुकसान हे थ्रिप्स किडीमुळे होते. प्रतिबंधात्मक उपाय आणि नियंत्रणात्मक उपायांचा उपयोग प्रभावी ठरतो.
मिरची पिकामधील थ्रिप्स (फुलकिडे) नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा वापर करणे सर्वात प्रभावी आहे. यामध्ये प्रतिबंधात्मक, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक उपायांचा समावेश होतो.
मिरचीमधील थ्रिप्स नियंत्रण:-
प्रतिबंधात्मक उपाय:-
* लागवडीसाठी कीडमुक्त आणि निरोगी रोपांची निवड करावी.
* पिकांची फेरपालट: एकाच क्षेत्रात पुन्हा पुन्हा मिरचीची लागवड न करता, पिकांची फेरपालटणी करावी.
* बीजप्रक्रिया: रोपे तयार करण्यापूर्वी, इमिडाक्लोप्रिड सारख्या शिफारसीत कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
* मल्चिंगचा वापर: लागवडीवेळी प्लास्टिक मल्च (आच्छादन) वापरल्यास फुलकिडींच्या संख्येत घट दिसून येते.
मिश्र पिकाचा वापर: मिरचीबरोबर मका, ज्वारी किंवा चवळी यांचे मिश्र पीक (Inter cropping) घेतल्यास थ्रिप्सचा शेतात प्रवेश कमी होतो.
* सुरुवातीलाच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत आणि जाळून टाकावीत.
* नीमपेंडचा वापर: प्रति हेक्टर ५०० किलो नीमपेंड (Neem Cake) जमिनीत मिसळून वापरावे.
यांत्रिक/भौतिक उपाय:-
* चिकट सापळ्यांचा वापर: शेतात प्रति एकरी निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत. प्रौढ फुलकिडे या सापळ्यांकडे आकर्षित होऊन चिकटतात.
* नीम तेल (Azadirachtin) उपयोग: पिक वाढीच्या अवस्थेत अझाडिराक्टीन 10000 PPM (१%) घटक असणारे नीम तेल 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरगुडी अर्क 50 ते 80 मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
जैविक नियंत्रण:-
* जैविक बुरशीजन्य कीटकनाशकांमध्ये ब्युव्हेरिया बॅसियाना किंवा मेटारहायझियम ॲनिसोप्ली यांसारख्या जैविक बुरशीची फवारणी करावी. ही बुरशी फुलकिडीच्या शरीरात प्रवेश करून त्यांना मारते.
रासायनिक नियंत्रण:-
* जेव्हा थ्रिप्सचा प्रादुर्भाव खूप वाढलेला असेल आणि वरील उपायांनी नियंत्रण होत नसेल, तेव्हाच तज्ञांच्या सल्ल्याने आणि आलटून-पालटून रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.
* प्रादुर्भाव जास्त दिसल्यास स्पिनोसॅड किंवा स्पिनेटोराम किंवा डायफेन्थुरॉन 47% अधिक बायफेन्थ्रीन 9.40% (संयुक्त कीटकनाशक) किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5% या कीटकनाशकांची फवारणी करावी.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
ओंकार शिवाजी जगदंबे, नांदेड
शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर
शिव कापसे, परभणी
रोहित, अकोला
सत्यनारायण जगन्नाथ,
अमित हटवार, रामटेक नागपूर
मुनीर पटेल, इचलकरंजी कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm #IPMSCHOOL #gogreen #chilli #thrips #pest #pestmanagement #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा