तंबाखूमधील नुकसानकारक विषाणूजनित रोग । प्रादुर्भाव लक्षणे । Viral Disease in Tobacco
तंबाखू हे विशिष्ट हवामानामध्ये येणारे पीक असून या पिकामध्ये किडी आणि रोगांचा प्रादुर्भावही खूप मोठा असतो. तसेच तंबाखूच्या पिकामध्ये अनेक प्रकारचे विषाणूजन्य रोगही येतात. तंबाखू मध्ये प्रामुख्याने टोबॅको मोझाईक व्हायरस (Tobacco Mosaic Virus - TMV), टोबॅको लीफ कर्ल व्हायरस (Tobacco Leaf Curl Virus - TLCV), टोबॅको स्ट्रीक व्हायरस (Tobacco Streak Virus-TSV), कुकुंबर मोझाईक व्हायरस (Cucumber Mosaic Virus-CMV), पोटॅटो व्हायरस वाय(Potato Virus Y - PVY) भारतामध्ये आढळणाऱ्या या विषाणूजनित रोगाव्यतिरिक्त जगात तंबाखूवर टोबॅको रॅटल व्हायरस (TRV), टोबॅको नेक्रोसिस व्हायरस (TNV), टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस (TSWV) यांसारख्या इतर अनेक विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
आज आपण तंबाखू पिकामध्ये प्रामुख्याने कोणत्या विषाणूजनित रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आणि त्याची लक्षणे कशी दिसतात याबद्दल माहिती घेऊया.
तंबाखूमध्ये प्रामुख्याने येणारे विषाणूजनित रोग:-
१.विषाणूजन्य मोझाईक रोग (Tobacco Mosaic Virus-TMV):-
* प्रमुख लक्षण:- पानांवर मोझाईक पॅटर्न दिसणे, म्हणजे पानांवर गडद हिरवे आणि फिकट हिरवे (किंवा पिवळे) रंगाचे चट्टे किंवा ठिपके येणे.
इतर लक्षणे:-
* पानांची विकृती: संक्रमित पाने वेडीवाकडी किंवा सुरकुतलेली होतात.
* वाढ खुंटणे: झाडाची वाढ खुंटते आणि ती खुजी राहतात.
* रंगातील बदल: जुन्या पानांवर गडद हिरव्या रंगाचे उंचवटे दिसू शकतात.
* देठांवर चट्टे: काही वेळा खोडावर आणि पानांच्या देठांवर गडद करपलेले पट्टे (Necrotic Streaks) दिसतात.
* त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो.
* हा विषाणू संसर्गाने (स्पर्शाने), रोगग्रस्त बियाण्याने किंवा शेती अवशेषांमार्फत पसरतो.
२. तंबाखू मुरडा रोग (Tobacco Leaf Curl Disease):-
* प्रमुख लक्षण: पानांना मुरड पडून (Leaf Curl) गोळा होतात.
इतर लक्षणे:
* पानांची जाडी आणि कडकपणा: पाने जाड होतात आणि खालच्या दिशेने गोळा होऊन मुरगळल्यासारखी दिसतात.
* शिरांमध्ये बदल: पानांच्या शिरा जाड होतात आणि सुजलेल्या दिसतात. यामुळे पानांच्या वरच्या पृष्ठभागावर खळगे तयार होतात.
* वाढ खुंटणे: झाडांची उंची कमी राहते.
* हिरवेपणा वाढणे: पाने अधिक गडद हिरवी पडतात.
* खालच्या बाजूला वाढ: पानांच्या खालच्या बाजूने शिरांच्या लगत बुंध्यासारख्या अनेक रचना विकसित होतात.
* या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी (White Fly) या रसशोषक किडीमार्फत होतो.
३. टोबॅको स्ट्रीक व्हायरस (Tobacco Streak Virus - TSV):-
तसा हा रोग तसा दुर्मिळ येतो, पण विशिष्ट परिस्थितीत तो तंबाखू पिकाचे अधिक नुकसान करू शकतो.
प्रमुख लक्षणे
* नेक्रोटिक चट्टे आणि रेषा/पॅटर्न:- पानांवर, विशेषत: शिरांच्या बाजूने, तपकिरी रंगाचे किंवा गडद करपलेले ठिपके आणि रेषा/पॅटर्न दिसतात.
* पानांची विकृती: कोवळी पाने करपलेली, सुरकुतलेली आणि विकृत झालेली दिसतात.
* शिरांचा रंग बदलणे: काहीवेळा पानांच्या शिरांवर तपकिरी रंगाची छटा दिसते.
* झाडाची वाढ खुंटणे: रोगाच्या तीव्र प्रादुर्भावामुळे झाडाची एकूण वाढ खुंटते आणि उत्पादन कमी होते.
* पिवळे किंवा तपकिरी चट्टे: पानांवर मोठे पिवळे किंवा तपकिरी रंगाचे चट्टे दिसू शकतात, ज्यामुळे गडद हिरव्या पेशींवर ठिगळासारखी रचना तयार होते.
हा विषाणू फुलकिडे (Thrips) या किडीमार्फत, तसेच परागकणांमार्फत (Pollen) आणि यांत्रिक नुकसानीमुळे पसरतो.
तंबाखूमध्ये हे तीन प्रमुख विषाणूजनित रोग नुकसान करतात. विषाणूजनित रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, रसशोषक किडींचे नियंत्रण करणे गरजेचे असते.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर
शिव कापसे, परभणी
सत्यजित मिरपुरे, यवतमाळ
विकास धुमाळ, बेकनाळ गडहिंग्लज कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #tobacco #tobaccofarming #disease #viraldisease #farming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा