तूर पिक । फुलांचे आणि शेंगांचे नुकसान करणाऱ्या किडी । Pest Damage in Pigeon Pea
तूर पिकामध्ये सुरुवातीपासून बऱ्याच किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. पण ज्यावेळी तूर फुलोरा अवस्थेत असते त्यानंतर बऱ्याच किडी तूर पिकामध्ये नुकसान करतात. या काळात झालेल्या किडीच्या प्रादुर्भावामुळे थेट उत्पन्नावर परिणाम होतो.
तूर पिकामध्ये फुलांचे आणि शेंगांचे नुकसान करणाऱ्या किडी महत्त्वाच्या आणि आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरतात. या किडींच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट येते.
तूर पिकामध्ये फुलांचे आणि शेंगांचे नुकसान करणाऱ्या प्रमुख किडी:-
१.शेंगा पोखरणारी अळी (Helicoverpa armigera):-
ही तूर पिकावरील एक प्रमुख आणि जास्त नुकसानकारक कीड आहे.
नुकसान:
ही अळी सुरुवातीला कोवळ्या पानांवर आणि फुलांवर खाते.शेंगा भरण्याच्या अवस्थेत, अळी शेंगांना छिद्र पाडून आपले अर्धे शरीर शेंगामध्ये खुपसून दाणे खाते, तर उर्वरित शरीर बाहेर ठेवते. यामुळे शेंगा पोकळ होतात आणि उत्पादन पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
२. शेंग माशी (Melanagromyza obtusa):-
तूर पिकामध्ये शेंगांच्या नुकसानीसाठी शेंग माशी ही दुसरी महत्त्वाची कीड आहे.हि साधारणपणे घरातील माशाप्रमाणे दिसणारी माशी असून रंगाने काळपट असते.
नुकसान:
माशी शेंगांच्या पृष्ठभागावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली अळी थेट शेंगामध्ये प्रवेश करते आणि आतील दाण्याला खाते. प्रादुर्भाव झालेल्या शेंगावर बाहेरून कोणतेही मोठे छिद्र दिसत नाही, परंतु शेंगाचे दाणे निकामी होतात. नुकसानीची जागा एक काळ्या रंगाच्या ठिपक्याने ओळखली जाते.
३. पिसारी पतंग / वाकड्या शेंगांची अळी (Plume Moth - Exelastis atomosa):-
या किडीचा प्रादुर्भाव अनेकदा शेंगा पोखरणारी अळी आणि शेंग माशी यांच्यासोबत होतो.
नुकसान:
या किडीच्या अळ्या शेंगांना छिद्र पाडतात आणि शेंगांच्या आतील दाणे खातात. या अळीमुळे शेंगा वाकड्या आणि विकृत होतात. ही अळी लहान, हिरवट आणि तंतुमय शरीराची असते.
४. मावा (Aphids):-
मावा हि कीड तूर पिकामध्ये कोवळ्या शेंड्यामधून रस शोषून पिकाला नुकसान पोहोचवते.
नुकसान:
मावा कोवळ्या फुलांचे आणि शेंड्यांचे रस शोषण करतो. रस शोषणामुळे फुले गळून पडतात किंवा कमकुवत होतात. मावा मधासारखा चिकट पदार्थ (Honeydew) सोडतो, ज्यामुळे फुलांवर आणि शेंगांवर काळी बुरशी (सुटी मोल्ड) वाढते.
या मुख्य किडींच्या सोबतच तूर पिकामध्ये फुलांचे नुकसान करणारी कीड ठिपक्यांची अळी, ब्लिस्टर भुंगा, थ्रिप्स, पाने गुंडाळणारी अळी, रस शोषण करणारे छोटे भुंगे या किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. पिकामध्ये येणाऱ्या किडी, ओळख आणि नुकसान ओळखून वेळीच कीड नियंत्रण उपायांचा वापर केल्यास पिकाचे नुकसान वाचेल.
या किडींचे नियंत्रण करण्यासाठी फुलोऱ्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत नियमित सर्वेक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार निंबोळी तेल (Neem Oil) किंवा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #pigeonpea #pest #podborers #pestinfo #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा