किचन गार्डन (परसबाग)। किड नियंत्रणाचे सोपे उपाय । Pest Management in Kitchen Garden
किचन गार्डन(परसबाग)मध्ये येणाऱ्या किडींचे नियंत्रण करण्यासाठी नैसर्गिक, जैविक आणि घरगुती उपाय खूपच प्रभावी ठरतात.यांचा वापर करूनच शक्यतो किचन गार्डन मधील किडीचे नियंत्रण करावे. रासायनिक कीटकनाशके टाळणे हे किचन गार्डनच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचे आहे.
किचन गार्डन(परसबाग)मध्ये येणाऱ्या किडींचे नियंत्रण उपाय:-
१. किडींची ओळख आणि प्रतिबंध:-
किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सर्वात महत्त्वाचे आहेत.
*नियमित निरीक्षण:- दररोज किंवा आठवड्यातून किमान दोनदा झाडांची बारीक-सारीक तपासणी करा. विशेषतः पानांच्या खालच्या बाजूला आणि नवीन कोवळ्या फांद्यांवर किडींचा शोध घ्या.
*झाडांचे आरोग्य सांभाळा: झाडांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसे पाणी, सूर्यप्रकाश आणि खते द्या. निरोगी झाडे किडींना लवकर बळी पडत नाहीत.
*पीक फेरपालट करा:- एकाच प्रकारची भाजी वारंवार एकाच जागी लावू नका. यामुळे विशिष्ट किडींचा जीवन साखळी तुटेल आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होईल.
*मिश्र पीक पद्धतीचा वापर करा:- किडींना दूर ठेवणारी काही विशिष्ट झाडे, जसे की झेंडू, तुळस, लसूण किंवा कांदा, मुख्य पिकांमध्ये किंवा त्यांच्या कडेला लावा.
२. नैसर्गिक आणि जैविक उपाय:-
अ) हात आणि पाण्याने नियंत्रण:-
*हाताने काढून टाकणे:- मोठ्या किडी (उदा. अळ्या, गोगलगाय) दिसल्यास त्या हाताने काढून टाका.
*पाण्याची फवारणी करावी:- मावा, पांढरी माशी, थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव कमी असल्यास, रोपांवर पाण्याचा जोरदार फवारा मारल्यास किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
ब) जैविक आणि हर्बल फवारणी उपाय:-
*निंबोळी तेल वापर:- मावा, पांढरी माशी, तुडतुडे, अळ्या, कोळी यांच्या नियंत्रणासाठी १ लिटर पाण्यात 5 मि.ली. निंबोळी तेल आणि थोडेसे सौम्य साबणाचे द्रावण मिसळून फवारा.
*लसूण-मिरचीचा फवारणी:- भाजीपाला पिकामध्ये नुकसान करणाऱ्या बऱ्याच प्रकारच्या किडीसाठी लसूण आणि तिखट मिरची (उदा. हिरवी मिरची) एकत्र वाटून पेस्ट बनवा. ती पाण्यात मिसळून 12 तास ठेवा. गाळून साबणाचे द्रावण मिसळून फवारणी करावी.
*साधे साबणाचे द्रावण वापर:- मावा, पांढरी माशी, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी १ लिटर पाण्यात 2−3 मि.ली. सौम्य साबणाचे द्रावण मिसळून फवारा.
*दशपर्णी अर्क वापर:- विविध प्रकारच्या अळ्या आणि किडीच्या नियंत्रणासाठी नैसर्गिकरीत्या 10 प्रकारच्या वनस्पतीच्या पानांपासून बनवलेला हा अर्क उत्तम कीडनाशक आहे.
क) मित्र कीटकांचा वापर:-
लेडीबर्ड बीटल: हे कीटक मावा आणि इतर लहान किडींना खातात. हे नैसर्गिकरीत्या बागेत आकर्षित होतील अशी झाडे लावा किंवा नर्सरीतून विकत आणा.
३. यांत्रिक नियंत्रण उपाय:-
किडींना पकडण्यासाठी आणि त्यांची संख्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या यांत्रिक उपायांचा वापर करावा.
*चिकट सापळे वापर:- पिवळे-निळे चिकट सापळे वापरल्यास पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, नागअळी यांसारख्या किडींना आकर्षित करून पकडतात.
*फेरोमोन सापळे वापर:- विशिष्ट प्रकारच्या नर कीटकांना आकर्षित करून पकडण्यासाठी याचा वापर केला जातो. यांच्या वापरामुळे किडीची प्रौढ अवस्था नियंत्रित केली जाते. त्यामुळे पिकाचे नुकसान होण्यापासून थांबवले जाते.
४.रोपांची छाटणी आणि स्वच्छता:-
*रोग/किड ग्रस्त भाग काढून टाका:- ज्या फांद्या किंवा पानांवर रोग/किड प्रादुर्भाव झाला आहे ती कापून लगेच बागेपासून दूर नष्ट करा.
*झाडांची विरळणी:- झाडांच्या फांद्यांमध्ये हवा खेळती राहील अशा प्रकारे छाटणी करा. झाडांमध्ये जास्त गर्दी झाल्यास किडीचे प्रमाण वाढते.
*परसबागेमध्ये स्वच्छता राखणे:- झाडांच्या मुळांभोवती गवत, पालापाचोळा किंवा कचरा जमा होऊ देऊ नका. यामुळे किडींना लपायला जागा मिळते.
या सोप्या सोप्या गोष्टीचा वापर करून किचन गार्डन मध्ये येणाऱ्या किडींचा बंदोबस्त करता येऊ शकतो, ज्यामुळे नुकसान टाळले जाऊन चांगले पीक, फळे, भाजीपाला मिळेल.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर
आनंद भास्करराव अजमिरे, हिवरखेड मोर्शी अमरावती
ओमकार माणिकराव मसाकल्ले, देवणी लातूर
मुनीर पटेल, इचलकरंजी कोल्हापूर
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #kitchengarden #pest #disease #management #practices #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा