फळझाडांची छाटणी । योग्य वेळ आणि घ्यावयाची काळजी । Pruning of Fruit Trees

 




फळझाडांची छाटणी करणे हे दर्जेदार आणि भरपूर फळ उत्पादन घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक फळझाडासाठी छाटणीची वेळ आणि पद्धत थोडी वेगळी असते, पण त्याचा हेतू साधारणपणे सारखे असतात.  

फळझाडांची छाटणी कधी करावी?

फळझाडांच्या छाटणीसाठी सामान्यपणे झाडाचा सुप्तावस्था हि सर्वात चांगली वेळ असते. सुप्तावस्थेत छाटणी केल्यास झाडावर कमी ताण येतो आणि नवीन फुटवा चांगला व जोमदार येतो.

* फळझाड छाटणी हि सर्वसाधारणपणे हिवाळा (डिसेंबर ते जानेवारी) किंवा नवीन फूट येण्यापूर्वी करावी. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे झाडाला आकार देणे, रोगग्रस्त भाग काढणे आणि नवीन फळ देणाऱ्या फांद्यांना प्रोत्साहन देणे हा असतो.


* द्राक्ष पिकामध्ये छाटणी हि दोन वेळा केली जाते. पहिली छाटणी हि ऑक्टोबर मध्ये केली जाते. उत्पादन वाढण्यासाठी हि चटणी केली जाते तर एप्रिल मध्ये केल्या जाणाऱ्या छाटणीला खरड छाटणी म्हणतात. द्राक्षाचे घड काढल्यानंतर हि चटणी केल्यामुळे बाकी मुख्य खोड मर्यादित ठेवता येते. अशा प्रकारे द्राक्षांमध्ये दोन वेळा छाटणी करणे आवश्यक असते.

* पेरूच्या बागेमध्येही साधारणपणे २ वेळा छाटणी केली जाते. एक छाटणी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये केली जाते आणि जो बहार घेतला जातो त्याला आंबिया बहार म्हटले जाते.  आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये जो बहार घेतला जातो त्याला मृग बहार म्हटले जाते. यांचा मुख्य उद्देश अतिघन लागवड पद्धतीत झाडांची उंची नियमित आणि कमी राहून अधिक उत्पन्न मिळावे हा आहे.

* आंबा बागेमध्ये २ वेळा छाटणी केली जाते, फळे काढल्यानंतर लगेच (जून/जुलै) किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर (थंडीचा जोर वाढण्यापूर्वी) हि छाटणी केली जाते.या छाटणीचा मुख्य उद्देश जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करणे असतो. 

* लिंबूवर्गीय झाडांची हलकी छाटणी पावसाळा संपल्यावर (सप्टेंबर-ऑक्टोबर) किंवा फेब्रुवारी मध्ये करावी. हि छाटणी केल्यामुळे झाडाचा सांगाडा मजबूत ठेवण्यासाठी उपयोग होतो.

* सीताफळ बागेमध्ये फेब्रुवारी महिन्यात हलकी छाटणी आणि जमीन नांगरट करावी.


छाटणी करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात:-

* सुप्तावस्था: ज्या झाडांची पानगळ होते (उदा. द्राक्ष, डाळिंब), त्यांच्या पानगळीचा काळ हा सुप्तावस्था असतो. या काळात छाटणी करणे फायदेशीर ठरते.

* फुलोऱ्यापूर्वी: जी फळे जुन्या किंवा नवीन फुटीवर येतात, त्यानुसार फुलोरा येण्याच्या वेळेनुसार योग्य छाटणीची वेळ ठरवली जाते.


फळझाडांची छाटणीची योग्य पद्धत:-

योग्य छाटणीमुळे झाडाला चांगला आकार मिळतो, हवा व सूर्यप्रकाश झाडाच्या आतपर्यंत पोहोचतो आणि रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.


फळझाडांमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची छाटणी केली जाते:-

* फॉर्मेटिव्ह छाटणी जी झाडांना वळण देण्यासाठी केली जाते. हि छाटणी प्रामुख्याने लागवडीनंतर पहिल्या 3−4 वर्षांत केली जाते.

* फळवाढीसाठी छाटणी हि छाटणी उत्पादन वाढवण्यासाठी दरवर्षी सुप्तावस्थेत केली जाते. 

* हार्ड छाटणी/टॉप वर्किंग छाटणी हि झाडांचे पुनरुज्जीवन करणे हा आहे. हि छाटणी जुनी आणि कमी उत्पादन देणारी झाडांची केली जाते.


फळझाडांची छाटणी करताना कोणत्या गोष्टी काढून टाकाव्यात:-

* रोगग्रस्त किंवा कीड लागलेल्या फांद्या.  

* एकमेकांत गुंतलेल्या किंवा एकमेकांवर घासणाऱ्या फांद्या.

* जमिनीला स्पर्श करणाऱ्या किंवा जास्त खाली असलेल्या फांद्या.

* पाण्याचे फुटवे किंवा फांद्यांच्या मुळांमधून निघालेले अनावश्यक फुटवे.

* झाडाच्या मध्यभागी जास्त गर्दी करणाऱ्या फांद्या, ज्यामुळे हवा आणि सूर्यप्रकाश आत पोहोचत नाही.


*छाटणीचे तंत्र आणि घ्यायची काळजी*

* धारदार हत्याराचा वापर: छाटणी नेहमी धारदार कात्री किंवा करवतीने करावी, जेणेकरून फांदीची साल निघणार नाही आणि फांदी पिचणार नाही.

* योग्य कट: छाटणी करताना, डोळ्याच्या किंवा फांदीच्या जोडाच्या 1 सेमी वर तिरकस छेद घ्यावा. छेद डोळ्याच्या विरुद्ध दिशेने तिरकस असावा.

* मोठी छाटणी केल्यानंतर, कापलेल्या भागावर रोग-कीड यांचा शिरकाव होऊ नये म्हणून त्वरित बोर्डो पेस्ट किंवा कोणतेही बुरशीनाशक पेस्ट लावावे.

* शक्यतो झाडाला छत्रीसारखा किंवा मध्यभागी उघडा आकार द्यावा, जेणेकरून झाडाच्या सर्व भागांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल.

स्रोत-इंटरनेट 

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

विकास धुमाळ, बेकनाळ गडहिंग्लज कोल्हापूर 

शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर 

शिव कापसे, परभणी 

उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद

*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipmschool #IPM #gogreen #horticulture #pruning #time&benefits #smartfarming 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest