प्रभावी कीड नियंत्रण । पिवळे निळे चिकट सापळ्यांची मदत । Sticky Trap Used In Pest Management





  शेतकऱ्याला पीक चांगले येण्यासाठी आणि उत्पन्न वाढण्यासाठी पिकामध्ये येणाऱ्या किडींचे नियंत्रण करणे खूप महत्वाचे असते. सध्या बाजारामध्ये इतक्या प्रकारची कीटकनाशके आहेत तरीही त्यांचा उपयोग करून कीड नियंत्रण हवे तसे होताना दिसत नाही. याचा विचार करून पिकाचे नुकसान वाचवून, कमी खर्चामध्ये प्रभावी पद्धतीने कीड नियंत्रण करायचे असेल तर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. 

एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये पारंपरिक आणि जैविक उपायांसोबत यांत्रिक नियंत्रण उपायांमधील कामगंध सापळे (ट्रॅप) चा आणि सोबत चिकट सापळ्यांचा उपयोग अतिशय महत्वाचा ठरतो.  


कीड नियंत्रणामध्ये पिवळे निळे चिकट सापळ्यांची मदत:-

रसशोषक किडी पिकांच्या पानांमधून, देठ आणि खोडामधून रस शोषण करूंन प्रत्यक्ष नुकसान तर करतात पण विषाणूजनित रोगांचा प्रसार करून देखील खूप मोठे नुकसान करतात. सर्व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे, निळे चिकट सापळे अतिशय प्रभावी काम करतात. 


*कीटकांना आकर्षित करणे:-

हे पिवळे आणि निळे चिकट सापळे विशिष्ट रंगांमुळे कीटकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात.


*पिवळे चिकट सापळे:- पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि नाग अळी यांसारख्या अनेक किडींना पिवळा रंग आकर्षित करतो. अनेक कीटक पिवळ्या रंगाला आकर्षित होऊन त्याकडे खेचले जातात आणि ट्रॅपच्या मदतीने नियंत्रित केले जातात. 

*निळे चिकट सापळे:- फुलकिडे नियंत्रणासाठी निळे सापळे अधिक प्रभावी मानले जातात. यासोबत निळ्या रंगाकडे डायमंड बॅक मॉथ किडीचे पतंग, नागअळीच्या माश्या आकर्षित होतात. 

*पांढरे चिकट सापळे:- या पिवळ्या आणि निळ्या चिकट सापळ्यासोबत पांढऱ्या रंगाचे चिकट सापळ्यांचा देखील वापर केला जातो. हे पांढरे चिकट सापळे मिरची, शिमला मिरची पिकामध्ये येणाऱ्या काळ्या रंगाच्या थ्रिप्स साठी अतिशय चांगले काम करतात. तसेच छोटे पाने खाणारे भुंगे आणि इतर छोटे बग हे देखील आकर्षित होतात. 

*कीटकांना पकडणे आणि त्यांची संख्या कमी करणे:-

कीटक रंगाकडे आकर्षित होऊन सापळ्यावर बसताच, त्यावरील चिकट पृष्ठभागाला  चिकटून राहतात आणि हालचाल करू शकत नाहीत.


*झटपट कीड नियंत्रणात मदत:- 

यामुळे बागेतील कीटकांची संख्या थेट कमी होते. मोठ्या प्रमाणात वापरल्यास, विशेषतः लहान क्षेत्रांमध्ये, ते किडीचा फैलाव होण्यापूर्वीच नियंत्रित करू शकतात.


*कीटकांचे निरीक्षण करणे:-

चिकट सापळ्यांचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे शेतात किडीचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही, हे तपासणे आणि त्या किडीचे प्रकार ओळखणे.


*कीड वाढीची सूचना मिळते:

जर सापळ्यांवर किडींची संख्या वाढू लागली, तर शेतकऱ्याला लगेच समजते की किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वीच वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होते.


कीड प्रादुर्भाव पाहून पुढील नियंत्रण उपाय करणे सोपे जाते:-

 सापळ्यांवर चिकटलेल्या कीटकांची संख्या मोजून(ETL) कीटकनाशक फवारणीची गरज आहे की नाही, याचा योग्य निर्णय घेता येतो.


*चिकट सापळे वापरण्याचे फायदे*

* पर्यावरणास अनुकूल:- हे सापळे पूर्णपणे गैर-रासायनिक (Non-Chemical) असल्याने पर्यावरण आणि मानवी आरोग्याला कोणतेही नुकसान पोहोचवत नाहीत.

* सुलभ वापर: ते वापर करण्यास आणि निरीक्षण करण्यास खूप सोपे आहे.

* कीडनाशकांचा वापर कमी: सापळ्यांच्या योग्य वापरामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो, ज्यामुळे उत्पादन खर्चही कमी होतो.

  प्रामुख्याने हे सापळे फक्त उडणाऱ्या (Flying) आणि लहान रसशोषक किडींना नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहेत. पेरणीनंतर एका आठवड्याभरात याचा वापर करणे अतिशय प्रभावी ठरू शकते. 

स्रोत-इंटरनेट 

उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-

दिपक वाडबुधे, नागपूर 

संकेत लब्दे, देवगड सिंधुदुर्ग 

शिवाजी चौगले, राधानगरी कोल्हापूर

प्रशांत पुजारी,

आनंद भास्करराव अजमिरे, हिवरखेड मोर्शी अमरावती 

सत्यजित मिरपुरे, यवतमाळ 

शिव कापसे, परभणी 

उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद


*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in

 *Join Us On Social Media Also👇* 

*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS

 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1

*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR

*Linkedin:-

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/


#ipmschool #IPM #gogreen #pest #pestmanagement #mechanicalpractices #stickytraps #yellowsticky #bluesticky #benefits #smartfarming 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊसामधील लोकरी मावा कीड । प्रभावी नियंत्रण । wooly Aphids Management

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

रसशोषक किडी । पिकाचे कसे नुकसान करतात । Damage by Sucking Pest