कांदा पिकातील नुकसानकारक कीड । थ्रिप्स - नुकसान आणि नियंत्रण उपाय । Thrips Management in Onion Farming
कांदा पिकामध्ये थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे हे उत्पादनात घट आणणारी सर्वात मुख्य कीड मानली जाते. ही कीड आकाराने अतिशय लहान असते, पण तिचे नुकसान करण्याचे प्रमाण मोठे असते.
इतर भाजीपाला पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो पण मुख्यता मिरची, कांदा पिकामध्ये या थ्रिप्सचा प्रादुर्भाव थोडा जास्तच दिसून येतो.
थ्रिप्स किडीचा कांदा पिकामध्ये प्रादुर्भाव:-
कसे नुकसान करतात?:-
रस शोषणे:- थ्रिप्स पानांच्या बेचक्यात (पोंग्यात) राहून पानांचा पृष्ठभाग ओरखडतात आणि त्यातून निघणारा रस शोषतात.
पांढरट चट्टे (Silvering):- रस शोषल्यामुळे पानांवर असंख्य पांढरट किंवा चांदीसारखे ठिपके/चट्टे दिसू लागतात. यामुळे पानांमधील हरितद्रव्य कमी होऊन प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते.
पाने वाकडी होणे:- प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने वरच्या बाजूला वळतात, वाकडी होतात किंवा पिळवटल्यासारखी दिसतात. शेवटी पाने वरून खाली वाळत जातात.
कांद्याच्या आकारावर परिणाम:- पानांचे नुकसान झाल्यामुळे कांदा नीट फुगत नाही, त्याचा आकार लहान राहतो आणि वजन घटते.
रोगांचा प्रसार:- थ्रिप्समुळे जखमा झाल्यामुळे 'करपा' (Purple Blotch) सारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव लवकर होतो.
थ्रिप्सचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण:-
थ्रिप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त रासायनिक औषधांवर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) करणे गरजेचे आहे:
मशागती व भौतिक उपाय:-
निळे चिकट सापळे (Blue Sticky Traps):- थ्रिप्स निळ्या रंगाकडे सर्वात जास्त आकर्षित होतात. शेतात एकरी ३० ते ४० निळे सापळे लावल्यास मोठ्या प्रमाणात कीड पकडली जाते.
तुषार सिंचन (Sprinkler):- शक्य असल्यास पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. पावसासारख्या पडणाऱ्या पाण्यामुळे पानांच्या पोंग्यातील कीड धुऊन जाते.
संरक्षक कुंपण वापर:- शेताच्या चारी बाजूंनी मका किंवा ज्वारीच्या दोन ओळी दाट लावल्यास बाहेरून येणाऱ्या थ्रिप्सचा प्रतिबंध होतो.
खत व्यवस्थापन:- युरियाचा (नत्र) अतिवापर टाळावा, कारण यामुळे पानांचा कोवळेपणा वाढतो त्यामुळे कीड लवकर वाढते.
जैविक नियंत्रण:-
निंबोळी अर्क वापर:- ५% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम (५० मिली प्रति १० लिटर पाणी) सुरुवातीला फवारणी करावी.
बुरशीजन्य कीटकनाशकांचा वापर:- ब्युव्हेरिया बॅसियाना किंवा मेटारायझियम अॅनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारल्यास किडीचे नैसर्गिक नियंत्रण होते.
रासायनिक नियंत्रण (प्रादुर्भाव वाढल्यास):
जेव्हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर जातो, तेव्हा खालीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची आलटून-पालटून फवारणी करावी:
फिप्रोनिल ५% SC (उदा. रीजेंट) १५ - २० मिली, प्रोफेनोफॉस ५०% EC २० मिली, स्पायनेटोरम ११.७% SC (उदा. डेलिगेट) १० मिली प्रति १० लिटर पाणी मधून फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यायची महत्त्वाची काळजी:
१.स्टिकरचा वापर:- कांद्याची पाने गुळगुळीत आणि मेचट असतात. औषध पानांवर नीट टिकावे आणि पोंग्यात उतरावे यासाठी फवारणीच्या द्रावणात चांगल्या दर्जाचे 'स्टिकर' अवश्य मिसळावे.
२.फवारणीची वेळ:- फवारणी नेहमी सकाळी लवकर किंवा सायंकाळी सूर्य मावळताना करावी. भर उन्हात फवारणी टाळावी.
३.पोंग्यात फवारणी: औषध पोंग्यात (पानांच्या बेचक्यात) जाईल अशा पद्धतीने नोझल धरून फवारणी करावी, कारण थ्रिप्स तिथेच लपलेले असतात.
अश्या पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून कीड नियंत्रण साठी प्रयत्न केल्यास नक्कीच कीड नियंत्रण होऊन होणारे नुकसान टाळता येईल.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
शरद बोन्डे , अचलपूर अमरावती
आनंद भास्करराव आजमिरे, हिवरखेड मोर्शी अमरावती
गणपतराव मिसाळ, जानेफळ भोकरदन जालना
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipm #ipmschool #gogreen #onion #onionfarming #thrips #damage #management #pestmanagement #oniongrowers #smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा