उन्हाळी सोयाबीन । जास्त उत्पादनासाठी महत्वाच्या गोष्टी । Summer Soyabean
बरेच शेतकरी खरीप हंगामासोबत उन्हाळी हंगामामध्येही सोयाबेन पीक घेत आहेत. उन्हाळी सोयाबीनसाठी योग्य वेळेत पेरणी करण्यासोबतच, उन्हाळी हंगामात खोल नांगरणी, बीजप्रक्रिया, योग्य वाणाची निवड, पाणी व्यवस्थापन (आंतरमशागत आणि ठिबक सिंचन), तण नियंत्रण (तणनाशक फवारणी), खत व्यवस्थापन (NPK), आणि कीड व रोग व्यवस्थापन या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून चांगली वाढ होऊन उत्पादन वाढेल. उन्हाळी सोयाबीन हे प्रामुख्याने बियाणे उत्पादनासाठी घेतले जाते. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पीक हातचे जात असल्याने शेतकरी प्रामुख्याने चांगल्या उत्पन्नासाठी तसेच प्रामुख्याने बियाण्याच्या दृष्टीने पिकवत आहेत. उन्हाळी सोयाबीनसाठी महत्त्वाच्या बाबी: १.पेरणीची योग्य वेळ:- वेळ:उन्हाळी हंगामी सोयाबीन डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्या पर्यंत पिकाची पेरणी करावी. जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलोऱ्यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो. पेरणीच्या वेळी दिवसाचे तापमान १८ ते...