उन्हाळी सोयाबीन । जास्त उत्पादनासाठी महत्वाच्या गोष्टी । Summer Soyabean
बरेच शेतकरी खरीप हंगामासोबत उन्हाळी हंगामामध्येही सोयाबेन पीक घेत आहेत. उन्हाळी सोयाबीनसाठी योग्य वेळेत पेरणी करण्यासोबतच, उन्हाळी हंगामात खोल नांगरणी, बीजप्रक्रिया, योग्य वाणाची निवड, पाणी व्यवस्थापन (आंतरमशागत आणि ठिबक सिंचन), तण नियंत्रण (तणनाशक फवारणी), खत व्यवस्थापन (NPK), आणि कीड व रोग व्यवस्थापन या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून चांगली वाढ होऊन उत्पादन वाढेल.
उन्हाळी सोयाबीन हे प्रामुख्याने बियाणे उत्पादनासाठी घेतले जाते. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पीक हातचे जात असल्याने शेतकरी प्रामुख्याने चांगल्या उत्पन्नासाठी तसेच प्रामुख्याने बियाण्याच्या दृष्टीने पिकवत आहेत.
उन्हाळी सोयाबीनसाठी महत्त्वाच्या बाबी:
१.पेरणीची योग्य वेळ:-
वेळ:उन्हाळी हंगामी सोयाबीन डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्या पर्यंत पिकाची पेरणी करावी. जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलोऱ्यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो.
पेरणीच्या वेळी दिवसाचे तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसच्या वर असावे. जर तापमान खूप कमी असेल, तर उगवण उशिरा होते किंवा बियाणे सडण्याची शक्यता असते.
२. वाणांची निवड:-
उन्हाळी हंगामात उष्णता सहन करू शकणारे वाण निवडावे:
*फुले संगम (KDS 726): हा वाण तांबेरा रोगाला प्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारा आहे.
*फुले किमया (KDS 753): उन्हाळी हंगामासाठी अत्यंत उपयुक्त.
*जे.एस. ३३५: जुना पण खात्रीशीर वाण.
यांसारख्या वाणांची निवड तुम्ही करू शकता ज्यामुळे तुम्हाला अधिक उत्पन्न मिळेल.
३.बीजप्रक्रिया:-
उन्हाळ्यात जमिनीतील उष्णतेमुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून त्यासाठी
३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिम बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास लावा.
पहिल्यांदा रासायनिक बीजप्रक्रिया करून त्यानंतर जैविक बीजप्रक्रिया करावी.
त्यामध्ये रायझोबियम आणि पी.एस.बी. (PSB) प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावून सावलीत वाळवावे. यामुळे मुळांवरील गाठींची संख्या वाढते आणि नत्र स्थिरीकरण चांगले होते.
४.पाणी व्यवस्थापन:-
उन्हाळी सोयाबीनसाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जमीन ओलावून घेऊन वाफसा आल्यावर पेरणी करावी. जमिनीच्या प्रकारानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलोरा अवस्था आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याची कमतरता भासू देऊ नका. पाणी कमी पडल्यास उत्पादनात मोठी घट होते. शक्य असल्यास तुषार सिंचनाचा (Sprinkler) वापर करावा, यामुळे हवेतील आर्द्रता टिकून राहते.
५. खत व्यवस्थापन
पेरणीच्या वेळी प्रति एकरी १ बॅग डी.ए.पी. (DAP) आणि १५-२० किलो पोटॅश द्यावे. सोयाबीनला गंधकाची (Sulphur) मोठी गरज असते, त्यामुळे एकरी १० किलो दाणेदार गंधक वापरावे, यामुळे दाण्यांचे वजन आणि तेलाचे प्रमाण वाढते.
६.कीड आणि रोग नियंत्रण
उन्हाळ्यात प्रामुख्याने पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, शेंगा खाणारी अळी, खोडमाशी सोबत पांढरी माशी, मावा आणि तुडतुडे या रसशोषक कीडींचाही प्रादुर्भाव होतो.
अळिवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर एकरी ८-१० प्रमाणे करावा. सुरुवातीला निम तेलाची फवारणी करावी आणि प्रादुर्भाव जास्त वाटल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५ एस सी (३ मिली) या इमामेक्टिन बेन्झोएट या प्रोफेनोफॉस ५० ईसी पैकी कोणत्याही एकाचा वापर करावा.
रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे निळे चिकट सापळे एकरी ४०-५० एकरी लावावेत आणि प्रादुर्भाव जास्त असेल तर थायमिथोक्झाम १२.६० % + लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी या कीटकनाशकाचा वापर करावा.
खोड माशीच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर १५-२० दिवसांनी प्रति एकरी १० किलो कार्बोफ्युरॉन जमिनीतून द्यावे किंवा सायअँट्रानिलिप्रोलची फवारणी करावी.
७. इतर महत्त्वाच्या टिप्स:
*पेरणीचे अंतर: दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवावे.
*आच्छादन: जमिनीत ओलावा टिकवण्यासाठी पाचट किंवा पेंढा वापरता येईल.
*जर तुम्ही बियाण्यासाठी सोयाबीन लावत असाल, तर इतर वाणांची सरमिसळ होणार नाही याची काळजी घ्या आणि फुलोऱ्यात असताना 'भेसळ' (Roguing) काढून टाका.
स्रोत-इंटरनेट
उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-
शरद बोन्डे , अचलपूर अमरावती
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद
*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇*
*Join Us On Social Media Also👇*
*You Tube:-*
https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS
*Instagram:-*
https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1
*Facebook:-*
https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR
*Linkedin:-*
https://www.linkedin.com/company/greenrevolutions/
#ipmschool #IPM #gogreen #soyabean #summersoyabean #soyabeanfarming #tips #Smartfarming
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा