भात पिकामध्ये नुकसान करणाऱ्या महत्वाच्या किडी । Pest Damage in Paddy
भात हे महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भात तसेच कोकणात प्रामुख्याने घेतले जाणारे पिक आहे. खरिपामध्ये भात पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसून येते.काही भागात पेरणी केली जाते, तर काही भागामध्ये रोप लावणी द्वारे भात पिक लावले जाते. भाताचे कमी उत्पादन मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे किडीचा प्रादुर्भाव आहे. रोपांच्या अवस्थेपासून ते पिक काढणीपर्यंत वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला भात पिकामध्ये दिसून येतो. कीड नियंत्रणासाठी पिकामध्ये कोणकोणत्या किडी येतात हे माहिती असल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी मदत होईल आणि आपला उत्पादन खर्चही कमी होईल. भात पिकामध्ये येणाऱ्या किडी:- लष्करी अळी:- अळया लष्करा प्रमाणे हल्ला करतात. रोपांची पाने कुरतडल्यामुळे पिकाची पाने नाहीसी होतात. तसेच पीक लोंबी अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुरडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला आढळतो. अळया रात्री कार्यक्षम असून दिवसा धानावर, बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात. गादम...