पारंपरिक कीड व्यवस्थापन पद्धती | Traditional pest management methods


गेल्या 50-60 वर्षापासून आपण पीक संरक्षनासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतोय. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे काही गैर नाही. पण कधीपर्यंत? जोपर्यंत आपण संतुलित व योग्य प्रमाणात वापर ठेवतो तो पर्यंत. आजची परिस्थिती पाहता रासायनिक किटनाशकांचा वापर संतुलित व योग्य होतोय का? ते तुम्ही स्वतःलाच विचारा
. रासायनिक कीटकनाशके वापरायच्या नादात आपण पूर्वापार वापरत आलेल्या कीड नियंत्रण पद्धती विसरून चाललोय ज्या पीक संरक्षनाचा मुख्य पाया आहेत आणि आजच्या सुधारित एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये प्रतिबंधक व पारंपरिक पद्धत म्हणून वापरतो. तर अश्या कोणकोणत्या पद्धती आहेत त्यांचा आढावा घेऊयात.
*1. उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी:-* जमीन मशागती मध्ये नांगरणी हा मुख्य विधी. नांगरणीमुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. किडीच्या विविध अवस्था जसे कोष जमिनी बाहेर पडतात व पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष बनतात. तसेच उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मातीचे तापमान वाढते परिणामी रोगजनीत बुरशीचे बीजाणू निष्क्रिय होऊन पुढील पिकास होणारा धोका टाळला जातो. *2.पेरणीची योग्य वेळ तसेच रोगमुक्त-रोगप्रतिकारक वाण निवडणे:-* सध्याच्या घडीला अनेक पिके बारमाही घेऊ शकतो. असे असले तरीही प्रत्येक पिकाच्या पेरणीचा लागवडीचा विशिष्ट हंगाम असतो. बाजारातील दर स्थिती, कीड व रोगाचा होणारा प्रकोप या बाबींचा विचार करून योग्य वाण निवडुन पेरणीची वेळ निश्चित करावी.त्यामुळे किडींपासून आपले पीक वाचेल.चांगला हमीभाव मिळेल.जसे वांगी पिकावर ऑगस्ट-सप्टेंबर महिण्यात शेंडे व फळ अळीचा उद्रेक होत असतो.त्यामुळे हा काळ चुकवून आपले पीक काढणीस येईल अशी वेळ निश्चित करणे फायद्याचे ठरते. *3.पीक फेरपालटनी:-* प्रत्येक हंगामात आपण वेगवेगळी पिके घेऊन पीक फेरपालटणी करत असतो. हे नेहमी फायद्याचे ठरते. पीक बदल झाल्याने मागील पिकातील मुख्य किडींची जीवन साखळी तुटते. तसेच जमिनीचा कस टिकून राहण्यास मदत होते. जो वारंवार एकच पीक घेतल्यामुळे कमी होतो. *4.सापळा पिके:-* सापळा पिक हा किडीचा उद्रेक करण्यासाठी उत्तम उपाय होय. सापळा पीक म्हणजे मुख्य पिकासोबत असे पीक लावणे जे किडींना दूर पळवेल किंवा आपल्याकडे आकर्षीत करून मुख्य पिकापासून परावर्तित करणे. जसे. ज्या पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो त्या पिकामध्ये चारी बाजूने दोन ओळी मक्का केल्यास मुख्य पिकात किडीचा शिरकाव 60 टक्यापर्यंत कमी करू शकतो. तसेच थ्रीप्स म्हणजे फुलकिडे हे मक्क्याकडे आकर्षित होतात. थ्रीप्स चा प्रकोप कमी करण्यासाठी मक्का हे आंतरपीक घेऊ शकतो. त्यानंतर झेंडू हे पीक पीक रसशोषक किडी जसे पांढरी माशी,मावा यांना आपल्याकडे आकर्षित करते. मुख्य पिकातील प्रादुर्भाव कमी करते.तसेच माव्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चवळी पीक मुख्य पिकातून घेऊ शकतो. *5.शेत तणमुक्त ठेवणे:-* म्हणजेच आपल्या शेतामध्ये स्वच्छता ठेवणे.जितके आपण आपले क्षेत्र तणमुक्त ठेवू तितका रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव कमी व मुख्य पिकाच्या वाढीस वाव मिळतो.असा आपल्या सर्वांच्या अनुभव. कारण मुख्य पीक निघाल्यानंतर आसपासच्या बांधावरील तनामध्ये कीड आश्रय घेते . रोगांचे बीजाणू इतर तनांवर वाढू शकतात. त्यामुळे नेहमी आपले शेत तणमुक्त ठेवणे फायद्याचे. *6.पक्षिथांबे:-* आपण शेतामध्ये पक्षीथांबे लावून पक्ष्यांचे आमंत्रित करतो. हे पक्षी पिकातील अळ्या वेचून खातात.पिकाला नैसर्गिकरित्या संरक्षण मिळवून देण्याचे काम करतात. इंग्रजी 'T' आकाराचे पक्षिथांबे एकरी 10 या प्रमाणात लावले तर खूप परिणामकारक ठरतात. तसेच काही पारंपरिक जैविक उपाय वापरणे आपल्याला फायद्याचे आहे. जसे निंबोळी अर्क,दशपर्णी . निंबोळी अर्क हा लहान अळ्या, किडींचे अँडीपुंज नष्ट करतो.तसेच त्यामुळे किडीमध्ये प्रतिरोध तयार होत नाही जो रसायने फवारल्यामुळे होतो. निंबोळी अर्काचा वापर आपण पूर्वापार करत आहोत. त्याचे फायदे ही जाणतो पण प्रयोगशील होऊन वापरण्यास कोणी तयार नाहीत. पीक संरक्षनाचा गाभा असलेल्या या परंपरागत पद्धती विसरून चालणार नाहीत. कारण सुरवात करायला चुकलो,हंगाम चुकला,वाण चुकीचे निवडले,सतत एकच पीक घेतले तर ही नक्कीच चूक सुधारणा करण्यासाठी पुढे पैसे व वेळ वाया घालवा लागणार,होणारे नुकसान ते वेगळेच त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा हा पाया विसरून चालणार नाही. विसरलो तर घरपती एक कर्करोगी सापडायला चालू झाला तर त्यामध्ये आश्चर्य काही नसेल. त्यामुळे कालच्या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या व वाचणाऱ्या सर्वांनी विचार करावा.



 *उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांची नावे:-*

🌱पी एस बर्डे अकोला

*उत्तर देणाऱ्या शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार*


*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing