पांढऱ्या माशीच्या प्रतिबंधक उपाय | Preventive measures against whitefly

 


*पांढऱ्या माशीच्या प्रतिबंधासाठी खालील उपाय करावेत.*

* योग्य वेळी पिकाची लागवड करावी. 

* शेत तणमुक्त ठेवावे.  

* नत्रयुक्त खतांची शिफारस व संतुलित मात्रा द्यावी,अतिवापर टाळावा,कारण कोवळ्या रोपांचे पांढऱ्या माशी आकर्षित होतात.  

* पांढऱ्या माशीला भाजीपाल्याच्या बागेतून दूर ठेवण्यासाठी  पिवळे  चिकट सापळे एकरी ३० - ४० या प्रमाणात लावून घ्यावेत. 

* मुख्य पिकासोबत झेंडू हे आंतरपिक करावे . 

* मका,ज्वारी किंवा बाजरी सारखे उंच वाढणारी पिकाची मुख्य पिकाच्या कडेने दाट लागवड करावी. 

* मल्चिंग पेपरच्या वापराने पीक तनमुक्त राहते. त्यामुळे रसशोषक किडी जसे मावा,पांढरा माशी, तुडतुडे यांचा पिकातील वावर कमी होतो. त्याचबरोबर प्रकाश प्रवर्तनामुळे किडी पिकापासून दूर राहतात.

* कीड आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास शिफारसीत आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा. 

या पद्धतींचा वापर करून पांढऱ्या माशीस चांगला प्रतिबंध करून पीक कीडमुक्त ठेवू शकता. 

एकात्मिक कीटक व्यवस्थापनासंबंधित नवनवीन अपडेट्स साठी नक्की सामील व्हा..👇👇

 https://www.facebook.com/groups/522198518657687/?ref=share

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हुमणी कीड प्रभावी नियंत्रण । प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय । White Grub Management |

बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेचे फायदे । Benefits of Seed Treatment |

उन्हाळ्यामधील जमीन नांगरणी । फायदे । Benefits of Summer Ploughing