आंबा मोहोर व फळधारणा वाढविण्यासाठीचे उपाय | Measures to increase mango blossom and fruit
सध्या आंब्याच्या झाडांना सर्वत्र कमी अधिक प्रमाणात मोहोर दिसू लागला आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला जातो. महाराष्ट्राच्या कोकण भागात तर आंब्याच्या खूप मोठ्या बागा आहेत. बदलत्या हवामानामुळे तसेच कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. तर अगदी सुरुवातीच्या काळापासून मोहोराच्या संरक्षणासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच चांगल्या पद्धतीने मोहोर टिकून चांगले आंब्याचे उत्पन्न शेतकऱ्याला नक्की मिळेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि अगदी सुरुवातीपासून मोहोर संरक्षण कश्या पद्धतीने केले पाहिजे. आंबा मोहोराची काळजी:- आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते. क्वचित प्रसंगी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मोहोर येतो. तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. किडी तसेच करपा, भुरी इ. रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे. मोहोर फुटल्यानंतर जर फवारणी केली तर किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते. किडीचा प्रादुर्भाव:- म...