फ्लॉवर /कोबी पिकामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कोणत्या विकृती दिसतात | .What are the defects seen in flower/cabbage crop due to nutrient deficiency



कोबी, फ्लॉवर किंवा ब्रोकोली सारखी पिके बरेच भाजीपाला पिकवणारे शेतकरी हि पिके घेत असतात. हंगामानुसार बाजारामध्ये चांगला भाव देखील मिळतो. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पिकामध्ये वेळेवर लागणीपासून कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींचं वेळेवर नियोजन करणे गरजेचे आहे. 

 पिकाची रोपे लावल्यानंतर खत व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे कारण पिकाच्या गरजेनुसार पिकाला अन्नद्रव्ये न मिळाल्यास पिकामध्ये वेगवेगळ्या विकृती दिसून येतात. तर आज आपण कोबी, फ्लॉवर पिकामध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोणत्या विकृती दिसतात हे जाणून घेणार आहोत. 


अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती

व्हिपटेल:-

 फुलकोबीच्या पानाच्या पात्याची नेहमीसारखी वाढ न होता ती अरुंद व खुरटलेली दिसतात. झाडाचा शेंडा खुरटलेला राहतो व गड्डा भरत नाही. मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हा दोष उद्भवतो. विशेषतः आम्लीय जमिनीत म्हणजेच ज्या जमिनीची आम्ल-विम्लता ४.५ पेक्षा कमी आहे तेथे ही विकृती दिसून येते.


ब्राउनिंग (ब्राउन रॉट्):-

 बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हा दोष होतो. खोडावर व प्लॉवरच्या गड्यावर कुजकट व भुरकट रंगाचे डाग दिसतात.


बटनिंग:-

फुलकोबीमध्ये नेहमीसारखा गड्डा न धरता बटणासारखा अगदी छोटा गड्डा तयार होतो. पानांची वाढही खुंटलेली दिसतें. हा दोष मुख्यतः नत्राच्या कमतरतेमुळे होतो, तसेच लवकर येणाऱ्या जाती उशिरा लावल्यामुळे गड्डा न भरता लहान राहतो.


रायसीनेस:-

 हा दोष फुलकोबीचा गड्डा वेळीच न काढल्यामुळे दिसून येतो. काही प्रमाणात हा आनुवांशिक दोष समजला जातो. फुलकोबींचा पृष्ठभाग एकसमान न दिसता खडबडीत ओणि सुटा दिसतो. तापमानात एकदम होणाऱ्या चढ-उतारामुळेही हा दोष उद्भवतो.

  या विकृतींसोबतच फॉस्फरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाच्या जुन्या पानांवर प्रभाव दिसून येतो.तर झिंक या अन्नद्रव्यामुळे नवीन येणारी पाने लहान राहतात आणि पिकाचा रंगावर सुद्धा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे माती परीक्षण करून पिकाच्या गरजेनुसार खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे ज्यामुळे नुकसान कमी होईल आणि चांगले पीक राहून अधिक उत्पन्न मिळेल. 

स्रोत-अग्रोवोन


*अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.👇* 

www.greenrevolutions.in


 *Join Us On Social Media Also👇* 


*You Tube:-*

https://youtube.com/@PheromoneTrap?si=KrfCv82YarfHVwTS


 *Instagram:-*

https://www.instagram.com/greenrevolution87?igsh=c3E5MGQ0aDJ2ZDk1


*Facebook:-* 

https://m.facebook.com/groups/522198518657687/?ref=share&mibextid=8oHioR


*Linkedin:-* 

https://www.linkedin.com/company/greenrevolutions/



#ipm_school #IPM #gogreen #agriculture #cabbage #cauliflower #NutrientDificiency #Malformations #agri #smartfarming #farming

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ऊस पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्टे | Different Varieties of Sugarcane Crop and their Characteristics

ऊस लागवड करताना उसाची बीजप्रक्रिया कशी करावी | How to process sugarcane seeds while planting sugarcane

वांग्याची झाडे झुडुपासारखी होण्याची कारणे | Reasons for brinjal plants becoming bushy