हरभरा बीजप्रक्रिया । बीजप्रक्रियेमुळे मिळणारे फायदे । Seed Treatment Benefits
शेतकऱ्यांनी पेरणी करताना बीजप्रक्रिया करणे खूप महत्वाचे आहे. किमान ज्या पिकाला किडीचा रोगाचा प्रादुर्भाव जलद होऊन मोठे नुकसान होऊ शकते अश्या पिकासाठी तरी बीजप्रक्रिया केल्यास पुढे होणारे नुकसान टाळून चांगले उत्पादन शेतकरी घेऊ शकतात. हरभरा पिकासाठी बीजप्रक्रिया खूप महत्वाची भूमिका बजावते. आज आपण हरभरा पेरणी करताना बीजप्रक्रिया केल्यास कोणते फायदे मिळतात याबद्दल माहिती घेणार आहोत. हरभरा बीजप्रक्रिया:- बीजप्रक्रिया करताना पहिल्यांदा रासायनिक बुरशीनाशक/कीटकनाशकांचा वापर करावा आणि त्यानंतर जैविक घटकांचा वापर करावा. हरभरा पिकामध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी * कार्बेन्डाझिम + थायरम प्रत्येकी 2 ग्रॅम बियाणे व जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर त्वरित नियंत्रण. किंवा रासायनिक टेब्युकोनॅझोल 4 मिली प्रति 10 किलो बियाणे रोपाला मर रोगापासून दीर्घकाळ संरक्षण मिळते. * जैविक ट्रायकोडर्मा व्हिरीडी 4 ते 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा ही मित्र बुरशी जमिनीत वाढून रोगकारक फुझेरियम बुरशीला नष्ट करते. * पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत रसशोषक किडी आणि खोडमाशीपासून वाचवण...