कांदा पिकातील नुकसानकारक कीड । थ्रिप्स - नुकसान आणि नियंत्रण उपाय । Thrips Management in Onion Farming
कांदा पिकामध्ये थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे हे उत्पादनात घट आणणारी सर्वात मुख्य कीड मानली जाते. ही कीड आकाराने अतिशय लहान असते, पण तिचे नुकसान करण्याचे प्रमाण मोठे असते. इतर भाजीपाला पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो पण मुख्यता मिरची, कांदा पिकामध्ये या थ्रिप्सचा प्रादुर्भाव थोडा जास्तच दिसून येतो. थ्रिप्स किडीचा कांदा पिकामध्ये प्रादुर्भाव:- कसे नुकसान करतात?:- रस शोषणे: - थ्रिप्स पानांच्या बेचक्यात (पोंग्यात) राहून पानांचा पृष्ठभाग ओरखडतात आणि त्यातून निघणारा रस शोषतात. पांढरट चट्टे (Silvering):- रस शोषल्यामुळे पानांवर असंख्य पांढरट किंवा चांदीसारखे ठिपके/चट्टे दिसू लागतात. यामुळे पानांमधील हरितद्रव्य कमी होऊन प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. पाने वाकडी होणे: - प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने वरच्या बाजूला वळतात, वाकडी होतात किंवा पिळवटल्यासारखी दिसतात. शेवटी पाने वरून खाली वाळत जातात. कांद्याच्या आकारावर परिणाम:- पानांचे नुकसान झाल्यामुळे कांदा नीट फुगत नाही, त्याचा आकार लहान राहतो आणि वजन घटते. रोगांचा प्रसार:- थ्रिप्समुळे जखमा झाल्यामुळे 'करपा' (Purple Blo...